रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी बांबू तंत्रज्ञान विकसित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:46 AM2017-10-30T00:46:53+5:302017-10-30T00:46:58+5:30
रस्त्यावरील खड्डे ही प्रत्येक शहराची समस्या असून, नागरिकांच्या जीविताशी निगडित हा प्रश्न असल्याने राजकीय सारिपाटावरही रस्त्यावरील खड्डे हा विषय नेहमीच ज्वलंत असतो. म्हणूनच रस्ते बनविण्यापासून ते त्यावरील खड्डे बुजविण्यापर्यंत राजकारण तापले जाते. वाहतूक कोंडी, धुळीचा त्रास, रस्त्यावरील खडीमुळे होणारे अपघात, त्यातून होणारी जीवितहानी या साºया प्रकारावरून खड्डे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे दिसून येते. याच खड्डेमुक्तीसाठी नानाविध उपाययोजना आजवर करण्यात आल्यानंतरही खड्डे पुराण अद्यापही संपलेले नाही.
संदीप भालेराव ।
नाशिक : रस्त्यावरील खड्डे ही प्रत्येक शहराची समस्या असून, नागरिकांच्या जीविताशी निगडित हा प्रश्न असल्याने राजकीय सारिपाटावरही रस्त्यावरील खड्डे हा विषय नेहमीच ज्वलंत असतो. म्हणूनच रस्ते बनविण्यापासून ते त्यावरील खड्डे बुजविण्यापर्यंत राजकारण तापले जाते. वाहतूक कोंडी, धुळीचा त्रास, रस्त्यावरील खडीमुळे होणारे अपघात, त्यातून होणारी जीवितहानी या साºया प्रकारावरून खड्डे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे दिसून येते. याच खड्डेमुक्तीसाठी नानाविध उपाययोजना आजवर करण्यात आल्यानंतरही खड्डे पुराण अद्यापही संपलेले नाही. आता मात्र खड्डेमुक्तीसाठी मुक्त विद्यापीठाने बांबू तंत्रज्ञान विकसित केले असून, त्याबाबतचा प्रयोगही यशस्वी करून दाखविला आहे. पावसाळ्यात रस्त्यांना पडणारे खड्डे ही मोठी समस्या बनली आहे. खड्डे बुजविले की तेथे किंवा जवळपासच पुन्हा खड्डा तयार होतो. खड्डे बुजविण्यासाठीचे सक्षम समजले जाणारे अनेक उपायही निरुपयोगी ठरले आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठानेदेखील यावर संशोधन केले असून, खड्डे बुजविण्यासाठी बांबूचा वापर केला तर खड्ड्यांची समस्या शंभर टक्के कमी होतेच; शिवाय पुन्हा त्या भागात खड्डाही तयार होत नाही याचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे, यासाठी लागणारे डांबर किंवा सीमेंट हेदेखील कमी प्रमाणात लागते. यामुळे खड्डा बुजविण्यासाठी कमी खर्च येणार असून, हे कामही मजबूत असे होणार आहे. मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश भोंडे यांचा बांबू संशोधनावर अभ्यास असून, त्यांनीच ‘कॉँक्रीटमध्ये बांबूची व्यवहार्यता’ यावर संशोधन केले आहे. बांबू हा लोखंडाला पर्याय ठरू शकतो याचा अभ्यास भोंडे यांनी केला असून, लोखंडापेक्षा बांबूमध्ये ताण घेण्याची क्षमता ही ९० टक्क्यांपर्यंत असते असा त्यांचा दावा आहे. घराचे छत, भिंती, कॉलम बनविण्यासाठी बांबू कॉँक्रीट उपयुक्त असल्याने रस्त्याच्या कामातही याचा वापर का करू नये, असा विचार करून त्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. मुक्त विद्यापीठाकडे जाणाºया रस्त्यावरच बांबू कॉँक्रीटच्या साह्याने खड्डे बुजविण्याचा प्रयोग करण्यात आला. भोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्त विद्यापीठाच्या संशोधन, अभियंता चमूने दोन खड्ड्यांवर प्रयोग केले.
बांबू उपयोगावर शास्त्रशुद्ध अभ्यासक्रमाची गरज
बांबू हे बहुगुणी आणि उपयुक्त असे गवत आहे. मात्र याच्या उपयुक्ततेबाबत भारतात अपेक्षित संशोधन आणि अभ्यासक्रम नसल्याने बांबूचा उपयोग केवळ कलात्मक वस्तू बनविण्यासाठीच आहे असे बोलले जाते. वास्तविक परदेशात २००० पासूनच बांबू संशोधनाला चालना मिळाली असून, बांबू उपयोगाबाबत मोठी जागरूकता निर्माण झालेली आहे. देशात आणि महाराष्टÑातही बांधकामात बांबूचा वापर होऊ शकेल असे बांबू निर्माण होतात. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामात बांबू बहुगुणी ठरू शकेल. या प्रयोगात विद्यापीठाच अभियंता किरण हिरे, तसेच कंत्राटदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
- दिनेश भोंडे, कुलसचिव, मुक्त विद्यापीठ
मुक्त विद्यापीठ मार्गावर प्रयोग
मुक्त विद्यापीठाकडे जाणाºया मार्गावरच हा प्रयोग करण्यात आला आहे. पावसाच्या पाण्यामुळे या मार्गावर अनेकठिकाणी खड्डे पडले आहेत. यापैकी २ मीटर बाय २ मीटरचे दोन खड्डे प्रयोगासाठी वापरण्यात आले. एका खड्ड्यावर बांबू आणि सीमेंट यांचा वापर करण्यात आला, तर दुसºया खड्ड्यात लोखंड आणि सीमेंट वापरण्यात आले. यासाठी ‘वेळू’ या जातीच्या बांबूचा वापर करण्यात आला. हे दोन्ही खड्डे परीक्षणासाठी सज्ज असून, नियमित परीक्षण केले जात आहे.
बांबूच्या वापरामुळे सीमेंट, लोखंडाची होणार बचत
बांबू तंत्रज्ञानामुळे कॉँक्रीटला तडे जात नाही. बांबूपट्टीमुळे खड्डे भरताना कमी सीमेंट लागते. त्यामुळे खर्चात बचत होते. याउलट दुसºया खड्ड्यात पहिल्या खड्ड्याच्या तुलनेत ४० टक्के अधिक सीमेंट लागले. प्राथमिक अंदाजावरून बांबू खड्ड्याचे कॉँक्रीट अत्यंत मजबूत आणि एकसमान झाल्याचे दिसते. याउलट दुसºया खड्ड्यावर सीमेंटचे बारीक खडे बाहेर येऊ लागल्याचे दिसते.