ओझरखेड धरणासह पर्यटन क्षेत्राचा विकास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:18 AM2021-08-27T04:18:23+5:302021-08-27T04:18:23+5:30

दिंडोरी : तालुक्यातील ओझरखेडसह विविध पर्यटन परिसराचा विकास व्हावा यासाठी विधानभवन येथे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे ...

Develop tourism sector including Ozarkhed Dam | ओझरखेड धरणासह पर्यटन क्षेत्राचा विकास करा

ओझरखेड धरणासह पर्यटन क्षेत्राचा विकास करा

Next

दिंडोरी : तालुक्यातील ओझरखेडसह विविध पर्यटन परिसराचा विकास व्हावा यासाठी विधानभवन येथे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे बैठक पार पडली. यावेळी झिरवाळ यांनी सांगितले की, नाशिक जिल्हा हा पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये पर्यटन विभागामार्फत काही क्षेत्राचा विकास करण्यात आला आहे. परंतु, जिल्ह्यातील काही ऐतिहासिक व निसर्गरम्य क्षेत्राचा विकास करणे आवश्यक आहे. रणतळे, रामशेज किल्ला, सप्तशृंगगड येथील चंडीकापूर ते पोट्या गणपती, साती पायऱ्या, देवसाने-मांजरपाडा वळण योजना, निसर्ग पर्यटन केंद्र आणि आदिवासी आयुर्वेद केंद्र, शेवखंडी, ता. पेठ, निसर्ग पर्यटन केंद्र या परिसराचा विकास करणे गरजेचे आहे. या क्षेत्राचा विकास आराखडा (डीपीआर) तयार करून घेण्यात यावा. तसेच त्याप्रमाणे निधी उपलब्ध करून देऊन या क्षेत्राचा विकास करण्यात यावा, अशी मागणी केली. मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत सर्वतोपरी सहकार्य करत विकासनिधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांकडून पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पर्यटन संचालक धनंजय सावळकर, उपसचिव वनमंत्रालय गजेंद्र नरवणे, उपसंचालक पर्यटन सारंग कुलकर्णी, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव आदींसह जलसंपदा, वन व पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Develop tourism sector including Ozarkhed Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.