जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण घटकांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:16 AM2021-02-13T04:16:01+5:302021-02-13T04:16:01+5:30

नाशिक : जिल्ह्याच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण अशा घटकांचा शाश्वत स्वरूपात विकास करण्यावर भर दिला ...

Development of characteristic elements in the district | जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण घटकांचा विकास

जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण घटकांचा विकास

Next

नाशिक : जिल्ह्याच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण अशा घटकांचा शाश्वत स्वरूपात विकास करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात ‘नाशिक १५१’ उपक्रमाच्या प्रस्तावित कार्यक्रम संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पालकमंत्री यांना आमंत्रित केले होते. यावेळी माहिती देताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे, विविध महोत्सवाचे आयोजन करणे व कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र तयार करणे अशा तीन टप्प्यात‘नाशिक १५१’ या कार्याक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यादरम्यान कलाग्राम, बोटक्लब व क्रीडा संकुल या प्रकल्पांना पूर्ण करण्यात येणार असून जिल्ह्यातील कृषी, गायन, साहित्य, पर्यटन, क्रीडा अशा विविध घटकांचा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

नाशिक हेरिटेज गार्डन, रामसृष्टी प्रकल्प, लेझर शो आणि नाशिक जिल्ह्याच्या १५० वर्षातील प्रगतीचे टप्पे दर्शविणारे असे कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्राची निर्मिती यानिमित्ताने करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली.

नाशिक १५१ या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी जिल्ह्यास २५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. या अनुषंगाने जिल्ह्यातील आदिवासी कलेपासून पैठणीपर्यंत तर शेतीपासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत अशा सर्व घटकांना एकत्रित व्यासपीठ मिळावे यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बहुसांस्कृतिक वैशिष्ट्यांचे जतन करून ते जगासमोर आणण्यासाठी कायमस्वरूपी असे प्रदर्शन केंद्र तयार करण्यात येणार असल्यााचेही भुजबळ यांनी सांगितले. नाशिकचा ठसा सर्वत्र उमटेल यासाठी ‘नाशिक १५१’ कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी दिली.

यावेळी महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी आदी उपस्थित होते.

Web Title: Development of characteristic elements in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.