मुलांच्या मेंदूचा विकास सहा वर्षांतच - रमेश परतानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:23 AM2018-06-18T00:23:28+5:302018-06-18T00:23:28+5:30
प्रत्येक मुलाची आकलनशक्ती आणि मेंदूची क्षमता सारखीच असते. पहिल्या सहा वर्षांतच मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो त्यामुळे मुलांची क्षमता ओळखून त्यांच्यावर योग्य संस्कार केले तर मुलांच्या मेंदूचा विकास अधिक चांगल्या रीतीने होऊ शकेल, असे प्रतिपादन आंतरराष्टय शिक्षणतज्ज्ञ रमेश परतानी यांनी केले.
नाशिक : प्रत्येक मुलाची आकलनशक्ती आणि मेंदूची क्षमता सारखीच असते. पहिल्या सहा वर्षांतच मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो त्यामुळे मुलांची क्षमता ओळखून त्यांच्यावर योग्य संस्कार केले तर मुलांच्या मेंदूचा विकास अधिक चांगल्या रीतीने होऊ शकेल, असे प्रतिपादन आंतरराष्टय शिक्षणतज्ज्ञ रमेश परतानी यांनी केले. महेश नवमीनिमित्ताने श्री माहेश्वरी समाजाच्या वतीने परतानी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, उद्योजक अशोक कटारिया, विनोद कपूर, रोशन जाजू, प्रदीप बूब, श्रीनिवास लोया, राजेंद्र डागा, रामेश्वर सोनी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी परतानी म्हणाले, मुलांची आकलन क्षमता आणि त्यांचे कौशल्य हेरून त्यांच्यावर योग्य शैक्षणिक संस्कार होणे अपेक्षित आहे. मुलांना तुम्ही काय दाखविले, ऐकविले, आपण त्यांना काय करण्यास सांगितले यावर त्यांच्या मेंदूचा विकास अवलंबून असतो. सहा वर्षांपर्यंत मुलांच्या मेंदूचा विकास इतका होतो की त्यांना दहा भाषा शिकविल्या जाऊ शकतात, असेही परतानी म्हणाले. पहिल्या सहा वर्षांत झालेल्या मेंदूच्या विकासावर पुढच्या आयुष्याचा मेंदूचा विकास अवलंबून असतो, असेही परतानी म्हणाले. यावेळी त्यांनी मेंदूच्या दहा भागांचे कार्य आणि महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयप्रकाश जातेगावकर यांनी केले. अशोक बंग यांनी आभार मानले. याप्रसंगी विनोद जाजू, सुरेश केला, बालकिसन धूत, यशवंत पाटील, राजेंद्र डागा, रोशन जाजू, श्रीनिवास लोया, कांतालाल लाहोटी, कल्पेश लोया, सोमनाथ जाजू, रामेश्वर मालपाणी, प्रदीप बूब, अरविंद नावंदर, हेमंत मालपाणी, प्रतिभा चांडक, आस्था कटारिया आदी उपस्थित होते.
नात्यातील सुगंध वृद्धिंगत करा : परतानी
असत्यालाच सत्य समजणे, एका ठराविक दृष्टिकोनातून जीवनाकडे बघणे, वस्तुस्थितीकडे पूर्वग्रहदूषितपणे बघणे यासारख्या कारणांमुळे मनुष्याच्या जीवनात दु:ख येतात़ जीवनाकडे तटस्थ भूमिकेतून बघणे, वस्तुस्थितीवर आधारित मत ठरविणे, सत्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणे व नात्यातील सुगंध अधिकाधिक वृद्धिंगत करीत जगणे म्हणजे जीवनाचा खरा आस्वाद घेणे असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पिरीच्युअल व मॅनेजमेंट ट्रेनर रमेश परतानी यांनी केले़
श्री महेशनवमी महोत्सव-२०१८ या कार्यक्रमानिमित्त सार्वजनिक वाचनालयाच्या औरंगाबाद सभागृहात आयोजित ‘नात्यातील सुगंध’ या विषयावर ते बोलत होते़ परतानी यांनी यावेळी सांगितले की, जीवनात प्रत्येकाला दु:खाला केव्हा न केव्हा तरी सामोरे जावे लागतेच़ मात्र या दु:खाला विसरण्यासाठी नेमका किती वेळ द्यायचा हे ठरवावे लागते़ अन्यथा, या दु:खातच आपले आयुष्य निघून जाते़ कुटुंबातील सदस्य हे गेल्यानंतर दु:ख हे साहजिकच आहे़ कुटुंबातील सदस्य केव्हा न केव्हा तरी जाणारच, तो केव्हा जाणार याची आपल्याला माहिती नसते त्यामुळे देवाने दिलेला प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा़ एकमेकांना प्रेम द्या, काळजी करा, जीवनातील प्रत्येक क्षण हा एक आठवण बनेल, असे जीवन जगण्याचे मार्गदर्शन परतानी यांनी केले़
यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष अशोक बंग, उमेश मुंदडा, जयप्रकाश जातेगावकर, अशिष भन्साळी, रामविलास बूब, राधाकिसन चांडक, बी़ बी़ चांडक आदी मान्यवर उपस्थित होते़ प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले़ या प्रसंगी व्याख्यानास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़