"विकास केला म्हणजे बारामतीकरांवर उपकार नाही केले, बारामतीची 'घडी' बंद पडणारच", चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला पुनरुच्चार

By संजय पाठक | Published: September 11, 2022 01:00 PM2022-09-11T13:00:38+5:302022-09-11T15:26:23+5:30

Chandrakant Bawankule: बारामती मतदारसंघ महाराष्ट्रातच आहे त्यामुळे अन्य मतदारसंघाप्रमाणे भाजपाने तिथे लक्ष केंद्रित केला आहे या ठिकाणी केवळ मी भेट देणार म्हटल्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी माझी 'कुळे' काढली त्यामुळे मी आता दर तीन महिन्याला या मतदारसंघाला भेट देणार आहे

Development means no favor to the people of Baramati, the 'clock' of Baramati will stop, reiterated Chandrakant Bawankule | "विकास केला म्हणजे बारामतीकरांवर उपकार नाही केले, बारामतीची 'घडी' बंद पडणारच", चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला पुनरुच्चार

"विकास केला म्हणजे बारामतीकरांवर उपकार नाही केले, बारामतीची 'घडी' बंद पडणारच", चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला पुनरुच्चार

Next

-  संजय पाठक 
नाशिक - बारामती मतदारसंघ महाराष्ट्रातच आहे त्यामुळे अन्य मतदारसंघाप्रमाणे भाजपाने तिथे लक्ष केंद्रित केला आहे या ठिकाणी केवळ मी भेट देणार म्हटल्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी माझी 'कुळे' काढली त्यामुळे मी आता दर तीन महिन्याला या मतदारसंघाला भेट देणार आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत' घडी' बंद पडेलच असा पुनरुच्चार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केला.

नाशिकमध्ये आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच माध्यमांची संवाद साधला यावेळी ते बोलत होते बारामती मध्ये जर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी विकास केला असेल तर उपकार नाही केले. 40 -40  त्यांना निवडून दिले जात आहेत त्यामुळे मतदार संघाचा विकास करणे कर्तव्य आहे असेही बावनकुळे म्हणाले.दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या टीकेचा त्यांनी समाचार घेतला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसमध्ये यावं हे त्यांचे विधान हास्यस्पद आहे पटोले यांनी पहिले आपले स्वतःचे स्थान सांभाळावे असे ते म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण हे भाजपाच्या संपर्कात असल्याचा इन्कार करून बावनकुळे यांनी पक्षांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना योग्य वागणूक दिली जात नाही असे सांगितले पक्षातील काही चुकीच्या गोष्टींवर बोलल्यामुळे त्यांना विधिमंडळातही चौथ्या पाचव्या रांगेत बसवण्यात येते मुख्यमंत्री असलेल्या नेत्याला अशा प्रकारची वागणूक देणे योग्य नाही भाजपात असे कधी होत नाही असेही ते म्हणाले मात्र पृथ्वीराज चव्हाण हे नाराज आहेत म्हणून त्यांनी पक्षावर काही टीका केली तर ते भाजपाचे संपर्कात आहेत असा त्याचा अर्थ होत नाही असेही बावनकुळे म्हणाले नाना पाटोले हे सध्या बावचळले नेते आहेत त्यामुळे ते काही विधान करतात असेही बावनकुळे म्हणाले.

Web Title: Development means no favor to the people of Baramati, the 'clock' of Baramati will stop, reiterated Chandrakant Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.