रामेश्वर धरण परिसराचा होणार विकास

By admin | Published: July 7, 2017 11:25 PM2017-07-07T23:25:02+5:302017-07-07T23:36:50+5:30

देवळा : रामेश्वर धरण परिसरात बगिचा व मनोरंजन उद्यान विकास कामास मंजुरी मिळाली आहे.

Development of Rameshwar Dam | रामेश्वर धरण परिसराचा होणार विकास

रामेश्वर धरण परिसराचा होणार विकास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळा : रामेश्वर धरण परिसरात नियोजित बगिचा व मनोरंजन उद्यान विकास कार्यक्रमातील पहिल्या टप्प्याच्या कामास १२७.८० लक्ष रुपयांची मंजुरी मिळाली आहे. या ठिकाणी वृक्षलागवडीचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या हस्ते करण्यात आला.
नवीन प्रशासकीय कार्यालय परिसराला अहेर यांनी भेट देऊन परिसर सुशोभिकरण करण्यासंदर्भात तहसीलदार कैलास पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी कार्यालय परिसरात नवीन वृक्षलागवड करण्यात आली.
नगराध्यक्ष वृषाली अहेर, संभाजी अहेर, कार्यकारी अभियंता कंकरेज, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, नगरसेवक जितेंद्र अहेर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. अहेर यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आमदार डॉ. अहेर यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. यासाठी १६ प्रजातींची दोन वर्षे वयाची मोठी झाडे लागवडीसाठी वापरण्यात आली.
उपअभियंता पाटील यांनी उद्यान विकास कार्यक्रमाची माहिती दिली. परिसरातील गुराख्यांनी उद्यान परिसरात आपली गुरे यापुढे चारावयास आणू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी नगरसेवक प्रदीप अहेर, सुनील पवार, किशोर अहेर, संजय चंदन, विजू गुंजाळ, कौतिक पवार, सुभाष अहेर, बंडू अहेर, पुंडलिक अहेर आदींसह नागरिक उपस्थित होते.

Web Title: Development of Rameshwar Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.