स्त्रीविना समाजाचा विकास अशक्य
By Admin | Published: February 11, 2017 11:51 PM2017-02-11T23:51:38+5:302017-02-11T23:51:58+5:30
देवरे : भाषा विषयाचे राज्यस्तरीय चर्चासत्र
मालेगाव : प्राचीन काळापासून समाजात स्त्रीला महत्त्व आहे. मनातील दु:ख आणि सुखाचा अनुभव स्त्रीशिवाय कोणीही घेऊ शकत नाही. स्त्रीविना समाजाचा विकास होणे अशक्य आहे म्हणून ईश्वराने ममत्वाचे स्थान फक्त स्त्रीच्या ठायी दिलेले आहे, असे मत महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे उपाध्यक्ष बी. के. देवरे यांनी येथे केले. तालुक्यातील सौंदाणे येथील कला महाविद्यालयात ‘भारतीय साहित्यातील स्त्री चिंतन’ या विषयावरील दोनदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न झाले. प्राचार्य डॉ. आर. पी. भामरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संयोजक डॉ. आर. एस. देवरे यांनी मार्गदर्शन केले. मसगा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम प्रमुख पाहुणे होते. महाविद्यालयाचे डॉ. उमेश जगदाळे, सोमैया महाविद्यालयाचे डॉ. जे. एस. मोरे, एस. पी. ए. महिला महाविद्यालयाच्या डॉ. अनिता नेरे, डॉ. भारती खैरनार, प्रा. भारती कापडणीस यांनी सहभाग घेतला. राज्यातून प्राध्यापकांनी ३४ शोधनिबंधाचे वाचन केले. चर्चासत्राचे समन्वयक इंग्रजी विभागप्रमुख प्रा. बी. पी. शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. यू. चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विभागप्रमुख डॉ. व्ही. डी. सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. चर्चासत्राचे समन्वयक,
मराठी विभागप्रमुख डॉ. अरुण पाटील यांनी आभार मानले. प्रा. डी. झेड. सावळे, प्रा. एम. डी. भामरे, प्रा. डॉ. अनिल पवार, प्रा. एन. ए. पाटील, प्रा. डॉ. बी. यू. पवार, प्रा. एस. के. बोरसे, प्रा. डी. पी. पवार, कार्यालयीन अधीक्षक बी. यू. अहिरे, डी. जे. हिरे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)