नाशिकच्या बागलाण तालुक्याला प्रधानमंत्री सडक योजनेतून होणार १३ कोटींची विकासकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:46 PM2017-11-04T13:46:33+5:302017-11-04T13:55:04+5:30
नाशिक : बागलाण विधानसभा मतदारसंघात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे १३ कोटींची रस्त्यांची कामे मंजूर झाल्याची माहिती आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.
आमदार दीपिका चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार यांच्या कक्षात शुक्रवारी (दि.३) बागलाण मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत आढावा घेऊन कामे जलदगतीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये सभापती यतिन पगार, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता एस. पी. राजगुरू आदी उपस्थित होते. बागलाण मतदारसंघात रामा २७ ते आसखेडा वाघळे श्रीपूरवडे टिंग्री हिंदळबारी रस्ता ( ५ कोटी ७८ लाख) रामा-२७ पिंपळदर दºहाणे खमताणे नवे निरपूर चौधाणे रस्ता (४ कोटी ९९ लाख) व रामा-७ आव्हाटी भंडारपाडा भाक्षी ते रामा-२७ रस्ता (२ कोटी ८७ लाख) अशी सुमारे साडेतेरा कोेटी रुपयांची कामे मंजूर झाल्याचे यावेळी विजय पाटील यांनी सांगिले. ही कामे तत्काळ गती देऊन पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी आमदार दीपिका चव्हाण यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना दिल्या.