कोट्यवधींची विकास कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:19 AM2018-11-16T00:19:07+5:302018-11-16T00:19:24+5:30

मागील चार वर्षांच्या काळात मतदारसंघात विविध कामांसाठी जवळपास दोन हजार कोटींचा निधी भाजप सरकारने उपलब्ध करून दिला असून रस्ते, सिंचन, ग्रामीण सोयीसुविधा उभाल्या जात असल्याचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 Development works of billions | कोट्यवधींची विकास कामे

कोट्यवधींची विकास कामे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील चार वर्षांच्या काळात मतदारसंघात विविध कामांसाठी जवळपास दोन हजार कोटींचा निधी भाजप सरकारने उपलब्ध करून दिला असून रस्ते, सिंचन, ग्रामीण सोयीसुविधा उभाल्या जात असल्याचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आ.तान्हाजी मुटकुळे यांनी आपल्या कार्यकाळातील कामांचा संकल्प सिद्धी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, मतदारसंघातच नव्हे, तर जिल्ह्यात कोट्यवधीची विकास कामे भाजप सरकारच्या काळात होत आहेत. २५१५ योजनेत ५.२५ कोटी, जिल्हा वार्षिक योजनेत ८.४0 कोटी, नगरपंचायत सेनगाव- पाणीपुरवठा व रस्त्यांसाठी २६ कोटी, नगर परिषद हिंगोली- भूमिगत गटार, न.प. इमारत, सभागृह, शेतकरी भवन आदीसाठी १२0 कोटी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत १२२.४१ कोटी, राज्य अर्थसंकल्पीय तरतुदीत २१९ कोटी, नाबार्डअंतर्गत रस्त्यांसाठी २.५0 कोटी, केंद्रिय मार्ग निधी योजनेत ९.0२ कोटी, इमारतींसाठी २५ कोटी, सिंचन अनुशेषांतर्गत बंधाऱ्यांना ७.0७ कोटी, जलयुक्त शिवार योजनेत ११ कोटी, इतर मोठ्या कामांसाठी ४00 कोटी रुपयांचा निधी आणल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये साखरा-जयपूर रस्ता, माळहिवरा गोरेगाव रस्ता, मालेगाव, रिसोड, सेनगाव, हिंगोली रस्ता, फाळेगाव ते येलदरी रस्ता आदींचा समावेश आहे. याशिवाय जनतेच्या सहभागातून नर्सी नामदेव येथील मंदिराचे व हिंगोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्वप्न साकार झाल्याचेही ते म्हणाले.
यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी खा.शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, नगरसेवक गणेश बांगर, के.के.शिंदे उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत आ.तान्हाजी मुटकुळे यांनी रामरतन शिंदे यांच्यावर सरशंधान साधताना माझीच कामे ते आपल्या नावाने देत असल्याचे सांगून दलित वस्तीत मी ही कामे शिफारस केल्याने मंजूर झाल्याचे सांगितले. तर दुसरीकडे रामरतन शिंदे यांनी पालकमंत्री दिलीप कांबळे यांना दिलेल्या पत्रातील जांभरुण रोडगे, जवळा बु., देवूळगाव आदी गावांची यादी दाखवून तीच मंजूर झाल्याचे सांगितले. तर या कामांची मी नव्हे, तर पालकमंत्र्यांनीच शिफारस केली होती, असेही सांगितले. या प्रकारामुळे प्रथमच मुटकुळे व शिंदे यांच्यातील कलगीतुरा प्रथमच उघडपणे समोर आला आहे.

Web Title:  Development works of billions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.