गणपतरावांची विकासकामे पिढ्यानपिढ्या जनतेच्या स्मरणात राहतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:18 AM2021-08-22T04:18:06+5:302021-08-22T04:18:06+5:30

नाशिक : गणपतराव देशमुख यांनी लोकांसाठी आयुष्यभर त्यांचा देह झिजवला. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने सर्वसामान्य गोरगरीब, कष्टकरी, ...

The development works of Ganapatras will remain in the memory of the people for generations | गणपतरावांची विकासकामे पिढ्यानपिढ्या जनतेच्या स्मरणात राहतील

गणपतरावांची विकासकामे पिढ्यानपिढ्या जनतेच्या स्मरणात राहतील

Next

नाशिक : गणपतराव देशमुख यांनी लोकांसाठी आयुष्यभर त्यांचा देह झिजवला. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने सर्वसामान्य गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांच्या प्रश्नावर आवाज उठविला. धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यातही त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांनी केलेलं काम हीच त्यांची ओळख असल्याने त्यांनी केलेली ही विकासाची कामे पिढ्यानपिढ्या जनतेच्या स्मरणात राहतील, अशा शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.

येथील मुरकुटे हॉल येथे आयोजित श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर तांबे, आमदार हिरामण खोसकर, आमदार सीमा हिरे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, माजी महापौर दशरथ पाटील, ॲड. भगीरथ शिंदे, ॲड. जयंत जायभावे, ॲड. नितीन ठाकरे, डॉ. डी. एल.कराड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शरद आहेर, जयप्रकाश जातेगावकर, राजू देसले, व्यापारी बँकेचे चेअरमन निवृत्ती अरिंगळे यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुखांमुळे ओळखला जायचा. त्यांनी सांगोला मतदारसंघातून तब्बल अकरा वेळा आमदार होण्याचा मान मिळवत विक्रम रचला होता. कायमस्वरूपी दुष्काळाच्या सावटाखाली असलेला सांगोल्याचा आज जो काही कायापालट झाला, त्याच्यामागे गणपतरावांचे अथक प्रयत्न होते, असे नमूद करीत भुजबळ यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी बोलताना माजी मंत्री बबन घोलप, आमदार तांबे, ॲड. शिंदे यांनी गणपतराव यांच्या निधनाने एक अभ्यासू संसदपटू व सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेलं नेतृत्व हरपल्याची शोकभावना व्यक्त केली. आमदार हिरे, आमदार खोसकर यांनी ज्येष्ठ मार्गदर्शक गमावल्याचे सांगितले. अन्य मान्यवरांनीही त्यांच्या शोकभावना व्यक्त केल्या.

फोटो (२१भुजबळ अभिवादन)

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना अभिवादन करताना पालकमंत्री छगन भुजबळ.

Web Title: The development works of Ganapatras will remain in the memory of the people for generations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.