घोटी ग्राम पालिकेची विकासात्मक कारकीर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:10 AM2021-07-12T04:10:25+5:302021-07-12T04:10:25+5:30
घोटी ग्राम पालिकेच्या नेतृत्वाची धुरा युवक वर्गाकडे असल्याने नवीन संकल्पनेतून विकासाच्या ध्येयाकडे मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न घोटी ग्रामपालिका करीत आहे. ...
घोटी ग्राम पालिकेच्या नेतृत्वाची धुरा युवक वर्गाकडे असल्याने नवीन संकल्पनेतून विकासाच्या ध्येयाकडे मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न घोटी ग्रामपालिका करीत आहे. कित्येक वर्षांपासूनचा घोटीचा नळ पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न ग्रामपालिकेने पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून तांत्रिक मंजुरी मिळवली. मंत्री महोदयांनी लवकरच निविदा निघून कामास सुरवात होईल अशी ग्वाही देखील दिली. कित्येक वर्षांच्या रखडलेल्या योजनेला खऱ्या अर्थाने मूर्त रूप देण्याचे कार्य ग्राम पालिकेतील युवा पदाधिकाऱ्यांनी केले असल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
ग्राम पालिकेच्या विद्यमान नेतृत्वाखाली " सुंदर घोटी, स्वच्छ घोटी " बनवण्यासाठी व शहराच्या विकासाभिमुख दृष्टिकोनातून हजारो वृक्ष संवर्धनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. शहर सुंदर बनवण्यासाठी सुशोभित केले जाणार आहे.
शहरातील विकास कामामध्ये भावली धरण ते घोटी नळपाणी पुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहे. त्याबरोबरच झालेल्या कामांमध्ये आंबेडकर नगरमध्ये बुद्धविहार सभागृह, शहरातील बंदिस्त पक्क्या गटारी, संपूर्ण शहर रस्ते काँक्रिटीकरण, स्मशानभूमीतील शवदाहिनी तसेच, अंगणवाडी, व्यायामशाळा, सार्वजनिक शौचालये, शाळा, जिम, स्ट्रीट लाईट अशी विविध प्रकारची कामे संपन्न झाली आहेत. १४ वा वित्त आयोग, ठक्करबाप्पा योजना निधी, दलितवस्ती विकास आदी माध्यमातून बहुतांश कामे मार्गी लागली असून काही कामे सुरु आहेत तर काही कामे प्रस्तावित आहेत.
पुढील काळात कोट्यवधी रुपयांची कामे पावसाळ्यानंतर सुरवात होणार असून वर्षभरात विकासाभिमुख कार्य घडलेले दिसेल असे मत घोटी ग्रामपालिका सरपंच सचिन गोणके, रामदास भोर, संजय आरोटे, श्रीकांत काळे, हिरामण कडू, स्वाती कडू, अरुणा जाधव, रुपाली रुपवते, सुनंदा घोटकर, गणेश गोडे, रवींद्र तारडे, संजय जाधव, कोंड्याबाई बोटे, भास्कर जाखेरे, सुनीता घोटकर, वैशाली गोसावी, मंजुळा नागरे, अर्चना घाणे, पदाधिकारी यांनी व्यक्त केले आहे.
वर्षभरात झालेली घोटी ग्रामपंचायतीची विकासकामे
वॉर्ड क्रमांक १ मध्ये....
आंबेडकर नगर येथे अंतर्गत बंदिस्त गटार, बुध्द विहार सभागृह, दलित वस्ती अंतर्गत स्ट्रीट लाईट, संताजी नगर ते संताजी मंगल कार्यालयापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, बंदिस्त गटार.
वॉर्ड क्रमांक २ मध्ये .... इंदिरानगर येथे दलित वस्ती अंतर्गत गटारी बांधल्या.
स्ट्रीट लाईट.
वॉर्ड क्रमांक ३ मध्ये.... देशपांडे यांच्या घराजवळील बंदिस्त गटार बांधली.
नरहरी मंदिराजवळील बंदिस्त गटार बांधली. घोटीवाडीत तसेच कचरु मराडे ते शाम घोटकर यांच्या घरापर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्यात आली.
वॉर्ड क्रमांक ४ मध्ये... सुतार चाळ येथेे बंदिस्त गटार बांधली. छबू चव्हाण ते ललिता कोकीळे यांच्या घरापर्यंत बंदिस्त गटार बांधली. श्रमिकनगरात बंदिस्त गटारी पूर्ण केल्या. तसेच स्ट्रीट लाईट बसविण्यात आले.
वॉर्ड क्रमांक ५ मध्ये... बंदिस्त गटारी बांधल्या. जि.प. शाळा ते बोथरा यांच्या मिल पर्यंत बंदिस्त गटारी.
स्ट्रीट लाईट बसविण्यात आले.
वॉर्ड क्रमांक ६ मध्ये... मुलींच्या शाळेजवळील बंदिस्त गटार पूर्ण केली.
मच्छी व मटण मार्केट येथे ३० गाळे बांधण्याचे काम सुरु आहे.
कडू गल्ली काँक्रिट रस्ता.
आंबेडकर नगर (रमेश काळे ते राजू काळे यांचे घर) काँक्रिट रस्ता.
इंदिरानगर येथे ठिकठिकाणी बंदिस्त गटारी.
घोटीवाडी येथे व्यायामशाळा ( जिल्हा क्रीडा अधिकारी व आमदार निधी)
श्रीपाद बाबा नगर येथे काँक्रिट रस्ता.
माया बाजार ते जनता विद्यालय बंदिस्त गटार.
सप्तश्रृंगी नगर अंगणवाडी.
इंदिरानगर जि प शाळेला वॉल कंपाउंड.
आंबेडकर नगर समाज मंदिराला वॉल कंपाउंड.
उर्दू शाळा दुरुस्ती.
स्मशानभूमी दुरुस्ती व नवीन शवदाहिनी.
रामरावनगर येथे अशोक रसाळ घर ते रेल्वे गेटपर्यंत बंदिस्त नाला.
राजू काळे ते गणपत वालझाडे घर पाईप गटार.
HDFC बँक ते सुखलाल पिचा घर काँक्रिट बंदिस्त गटार.
सदानंद भटाटे ते तन्वीर सय्यद तसेच जगन घोडके ते पांडुरंग गुंजाळ घर काँक्रिट गटार व रस्ता.
मोहनलाल राखेचा घर ते नंदा भन्साळी घर काँक्रिट बंदिस्त गटार.
देशपांडे परिसर ते वीस बंगला काँक्रिट गटार,
इंदिरानगर चंदू निकम ते मनोहर हिवाळे काँक्रिट रस्ता.
रुख्मिणीबाई ठमके ते दीपक मराडे काँक्रिट रस्ता.
मनोज काळे ते जगन भगत दुकान काँक्रिट बंदिस्त गटार,
प्रतीक भोर ते वैभव झनकर घर काँक्रिट रस्ता.
पाणी फिल्टर मशीन खरेदी.
जेसीबी, ट्रॅक्टर खरेदी.
धुरळणी मशीन खरेदी.
आंबेडकर नगर अंतर्गत काँक्रिट रस्ते.
आंबेडकर नगर येथे किशोर रुपवते घर ते सार्वजनिक शौचालय पर्यंत काँक्रिट रस्ता.
श्रमिक नगर, आंबेडकर नगर, रामराव नगर व इंदिरा नगर येथील दलित वस्तीतील लोकांना स्वयंपाकी भांडे.
अंगणवाडी केंद्रांना टेबल खुर्ची, कपाट व लहान मुलांना खेळणी.
आंबेडकर नगर वाचनालयात टेबल, खुर्ची, कपाट व पुस्तके. (१० घोटी)
- पुरुषोत्तम राठोड, घोटी.
100721\190610nsk_38_10072021_13.jpg
घशेटी विकास.