"शासन आपल्या दारी उपक्रमाने अनेकांना पोटदुखी"; देवेंद्र फडणवीसांची टीका
By संदीप भालेराव | Published: July 15, 2023 03:53 PM2023-07-15T15:53:34+5:302023-07-15T15:56:42+5:30
चिंता करू नका, कुणाच्याही पोटात दुखत असेल तर त्यांना औषध देण्यासाठी आपण डॉक्टर एकनाथ शिंदे यांना आणले आहे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नाशिक: शासन आपल्या दारी योजनेला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. लोकांची कामे होत असल्याने लोक या ठिकाणी येतात परंतु काही लोकांना या उपक्रमाची पोटदुखी झाली आहे. या उपक्रमाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. गर्दी कशाला जमवता असा अशी टीका करतात. चांगले काम केले, जनतेला लाभ दिला तरी पोटात दुखत. पण आता चिंता करू नका, कुणाच्याही पोटात दुखत असेल तर त्यांना औषध देण्यासाठी आपण डॉक्टर एकनाथ शिंदे यांना आणले आहे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नाशिकमधील डोंगरे वसतीगृह मैदानावर आयोजित ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरेाधकांच्या टीकेला उत्तर दिले. सर्वसामान्यांपर्यंत सरकार पोहचत असून लोकांची कामे होत असल्याने शासन आपल्या दारी उपक्रमाला लोकांची गर्दी होत आहे. त्याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात असून अशा प्रकारे लोकांना कशासाठी बोलविले जाते असे टीका केली जात आहे. त्यांना मुख्यमंत्री औषध देतील असे सांगतानाच जर औषध पचनी पडले नाही तर अजितदादा आहेच, कुणाचीही पोटदुखी झाली असेल तर त्यांच्यावर आपण उपचार करणार आहोत असेही फडणवीस म्हणताच त्यांच्या या विधानाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजनराने प्रतिसाद दिला.