देवगाव-श्रीघाट रस्त्याची खड्ड्यांमुळे लागली ‘वाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:01 PM2020-06-22T22:01:17+5:302020-06-22T23:01:37+5:30
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव - वावी हर्ष - श्रीघाट रस्त्याला मोठे खड्डे पडले असून, या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या मार्गावरील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांसह वाहनधारकांनी केली आहे.
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव - वावी हर्ष - श्रीघाट रस्त्याला मोठे खड्डे पडले असून, या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या मार्गावरील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांसह वाहनधारकांनी केली आहे.
देवगाव ते श्रीघाट या मार्गावरून लांब पल्ल्याच्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. दररोज वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यांची अवस्था कुचकामी झाली आहे. वाडा-शिर्डी-नंदुरबार यासारख्या दूर मार्गाच्या बसेस याच रस्त्याच्या मार्गावरून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना कसरत करावी
लागते.
त्यामुळे वाहनांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले असून, वाहने नादुरुस्त होत आहेत. मोटरसायकलचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. चाळण झालेल्या रस्त्याने नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही. संबंधित विभागाचे दुर्लक्षघोटी-त्र्यंबकेश्वर या मार्गाची मुख्य रेलचेल याच रस्त्याने असल्याने दिवसभरात हजारो वाहने या मार्गाने मार्गक्र मण करत असतात. परंतु, पावसाळ्याच्या प्रारंभीच रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून, परिसरातील वाहनचालकांना जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे देवगाव परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.१ खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांमुळे अनेकांना अपंगत्व आले आहे तर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्याचप्रमाणे खड्ड्यांमुळे पाठदुखी व मनक्याच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. खड्डे आता जीवघेणे ठरत आहेत. पावसाळ्यात रस्त्यांवर गाळ व चिखल साचतो. त्यामुळे गाड्या घसरणे, अंगावर चिखल उडून कपडे घाण होणे नित्याचेच झाले आहे. २जोशी कंपनी ते वावीहर्ष, देवगाव ते श्रीघाट या मार्गावरील अर्धवट राहिलेले डांबरीकरण करण्याचे काम केव्हा होणार, या कामाला मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल नागरिक करत आहेत. देवगाव फाट्यावरील त्रिफुलीची मोडतोड झाली असून, दिशादर्शक नामफलकांचे दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणी किलोमीटरचे चिरे उन्मळून पडलेल्या अवस्थेत दिसत आहेत.