देवगावच्या ‘जिजाबाई’ जिंकल्या कोरोनाविरुद्धची लढाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:15 AM2021-04-28T04:15:45+5:302021-04-28T04:15:45+5:30
नऊ दिवसांपूर्वी जिजाबाई तुपे यांना कोरोनाची लक्षणे आढळून आली असता कुटुंबीयांचा थरकाप उडाला. तरीही प्राप्त परिस्थितीला तोंड देण्याचा निर्णय ...
नऊ दिवसांपूर्वी जिजाबाई तुपे यांना कोरोनाची लक्षणे आढळून आली असता कुटुंबीयांचा थरकाप उडाला. तरीही प्राप्त परिस्थितीला तोंड देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. येवला येथे एच.आर.सी.टी. केल्यानंतर जिजाबाई यांचा स्कोअर १७, तर ऑक्सिजनची पातळीदेखील ७८ ते ८० पर्यंत आल्याने तुपे कुटुंब पूर्णपणे धास्तावले होते. तुपे कुटुंबीयांनी जिजाबाई यांना लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले होते. नऊ दिवस लासलगावच्या ग्रामीण रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे जिजाबाई तुपे यांनी सोमवारी (दि.२६) कोरोनावर यशस्वी मात केली.
यावेळी लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.के. सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी, डॉ. अविनाश पाटील, डॉ. बाळकृष्ण आहिरे, डॉ. व्ही.एस. वडितके, रमेश तनपुरे, सविता जाधव, जोशी, वाय.एस. कोळी, एस. गाडेकर, स्मिता वाटेकर, अंकुश सुके, प्रणाली पाटील, गणेश भवर, ज्ञानेश्वर शिंदे, राजेंद्र जाधव, संतोष निरभवने, दतात्रय शिंदे, दिलीप जेऊघाले आदी आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुपे कुटुंबीयांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कोट...
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर फार मोठा आजार झाल्याचा भास होत होता. बरेच जण घाबरतात. मात्र, कोरोनाला जिद्द व इच्छाशक्तीच्या जोरावर त्याला पळवून लावायची मनाशी खूणगाठ बांधली, तसेच डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जगण्यासाठी नवी उमेद दिली. त्यांच्यामुळेच ही लढाई जिंकता आली.
-जिजाबाई तुपे, देवगाव
फोटो - २७ देवगाव १
देवगावच्या कोरोनामुक्त झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांकडून लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा करण्यात आलेला सत्कार.
===Photopath===
270421\27nsk_15_27042021_13.jpg
===Caption===
देवगावच्या कोरोनामुक्त झालेल्या महिलेच्या कुटुंबियांकडून लासलगाव येथील ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा करण्यात आलेला सत्कार.