माता जगदंबाच्या दर्शनासाठी देवगावला गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 04:26 PM2018-10-12T16:26:56+5:302018-10-12T16:27:06+5:30
देवगाव : नवसाला पवणारी अशी महती असल्यामुळे देवगावच्या जगदंबा भवानीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी ओसंडून वाहते. भाविक नवसपूर्ती म्हणून होम हवन करतात. ही देवी अंबाबाई म्हणूनही प्रसिद्ध आहे.
देवगाव : नवसाला पवणारी अशी महती असल्यामुळे देवगावच्या जगदंबा भवानीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी ओसंडून वाहते. भाविक नवसपूर्ती म्हणून होम हवन करतात. ही देवी अंबाबाई म्हणूनही प्रसिद्ध आहे. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
देवगाव जेव्हा नावारूपाला येऊ लागले तेव्हा माहूर येथील कुशाबा बोचरे हे गृहस्थ येथे वास्तव्यास आले. येताना त्यांनी माहूरगडावरून तुळजाभवानी मातेचा तांदळासोबत आणला होता. तिची प्रतिष्ठापना करून येथे मंदिर उभारले. दैत्याचा वध करून देवी जात होती तेव्हा त्रिशुळाला लागलेल्या रक्ताचा थेंब ज्या जागेवर पडला त्या ठिकाणी हे मंदिर उभारण्यात आले अशी आख्यायिका आहे. देवीपुराणामध्ये नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील माहेगाव येथे गोदावरी नदीतीरावर जगदंबेने आंघोळ केली.
मंदिराच्या सभोवती जनार्दन स्वामी मंदिर, भक्तनिवास, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, डी.आर. भोसले विद्यालय असल्याने परिसर दिवसभर गजबजलेला असतो. नवरात्रोत्साहात रात्रभर वाघे देवीची महती गात जागरण करतात. महिलावर्ग देवीची खणानारळाने ओटी भरून नवस फेडतात. उत्सवानिमित्त भवानीनगरातील युवकांनी मंदिर परिसरात साफसफाई करून विद्युत रोषणाईने सुशोभित केले आहे. तीस वर्षांपासून देवीभक्त बाळासाहेब गुरव हे देवी मंदिर व परिसराची देखभाल करतात. (12देवगाव माता)