देवगावी उघडे रोहित्र बनले धोकेदायक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:39+5:302021-07-14T04:17:39+5:30

देवगांव : येथील विद्युत रोहित्राच्या नियंत्रण पेटीची दुरवस्था झाली असून उघड्या पेटीमुळे दुर्घटना होण्याची भीती नागरिकांना वाटत असून रोहित्राचे ...

Devgavi open Rohitra became dangerous! | देवगावी उघडे रोहित्र बनले धोकेदायक !

देवगावी उघडे रोहित्र बनले धोकेदायक !

Next

देवगांव : येथील विद्युत रोहित्राच्या नियंत्रण पेटीची दुरवस्था झाली असून उघड्या पेटीमुळे दुर्घटना होण्याची भीती नागरिकांना वाटत असून रोहित्राचे ठिकाण बदलण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. तसेच विद्युत रोहित्र उघडे असून, त्याचे फ्यूज फुटलेले आहे. आणि फक्त तुटक्या तांब्याच्या तारा फ्यूजआधारे वीजपुरवठा सुरू आहे. रोहित्राचे झाकण नियमित उघडे असल्याने या परिसरात अपघात होण्याचा धोका असल्याने महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने नवे फ्यूज बसविण्याची मागणी होत आहे.

पावसाळ्यात फ्यूज उडणे, ठिणगी पडणे, शॉर्ट सर्किट होणे आदी प्रकार होत असतात. त्यामुळे अनेकदा बत्ती गूल होऊन अंधाराचा सामना करावा लागतो. विद्युत रोहित्राची जागा रस्त्यालगत असून बाजूलाच भात शेतीची आवणे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह जनावरांनाही धोका संभवून कधीही मोठी दुर्घटना घडू शकते. यासाठी महावितरण कंपनीने या भोंगळ कारभाराकडे वेळीच लक्ष देऊन संभाव्य जीवितहानी टाळावी. रोहित्राच्या पेटीच्या दरवाजाचे, कडीकोंडे तुटक्या स्थितीत असून पूर्णपणे गंजलेल्या स्थितीत आहेत. या रोहित्रावरील लोखंडी आवरण नाहीसे झाल्याने पूर्ण रोहित्र उघडे पडले आहे. त्यामुळे महावितरणच्या रोहित्राची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. उघड्या रोहित्रांमुळे नागरिकांना, जनावरांना विजेचा धक्का लागून बळी जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करुनही याकडे दुर्लक्ष केले जाते आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

इन्फो...

डीपीची जागा बदलण्याची गरज

विद्युत रोहित्राच्या नियंत्रण पेटीची दुरवस्था झाल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. तसेच डीपीची जागा शेत परिसरात व वर्दळीच्या ठिकाणी असल्याने डीपीची जागा बदलण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावाच्या दूरवर ठिकाणी डीपीची व्यवस्था केल्यास पावसाळ्यात होणाऱ्या शॉर्ट सर्किटमुळे नागरिक तसेच जनावरांना त्याचा धोका होणार नाही.

कोट...

डीपीच्या झाकणाची पावसामुळे गंजून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास फ्यूज टाकणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे विद्युत विभागाने नवीन नियंत्रण पेटी त्या ठिकाणी बसवावी. तसेच शेत परिसर व वर्दळीत असलेल्या रोहित्राची जागा बदलल्यास होणारा धोकादायक अनर्थ टळू शकतो.

- नामदेव दोंदे, देवगाव

120721\12nsk_22_12072021_13.jpg

रोहित्र

Web Title: Devgavi open Rohitra became dangerous!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.