लोकसहभागातून देवगाव रस्ता अतिक्रमणमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:45 PM2018-08-12T23:45:02+5:302018-08-13T00:30:44+5:30
येवला तालुक्यातील मानोरी ते देवगाव या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर दुतर्फा काटेरी झुडपे आणि बाभळींनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याने मानोरी बुद्रुकच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून वर्गणी गोळा करून अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला.
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी ते देवगाव या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर दुतर्फा काटेरी झुडपे आणि बाभळींनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याने मानोरी बुद्रुकच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून वर्गणी गोळा करून अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला साइडपट्ट्या नसून केवळ काट्यांमुळे रहदारी करणे दिवसेंदिवस अवघड होते चालले होते. थोड्याच दिवसांत टमाट्याची तोडणी सुरू होणार असून, ऐन पावसाळ्यात या रस्त्याची स्थिती दयनीय होत असते. रस्त्याला पूर्ण चिखलाचे स्वरूप प्राप्त होते . त्यात या काटेरी झुडपामुळे चारचाकी वाहने बाजूला घेण्याचा कोणत्याही प्रकारची सोय नसल्याने तीन किलोमीटर चा रस्ता लोकसहभागातून मोकळा करण्यात आला.
यावेळी सेवा संस्थेचे अध्यक्ष नंदाराम शेळके, साहेबराव शेळके , दत्तात्रय शेळके,आण्णा शेळके , वासुदेव शेळके,बाळू शेळके,दशरथ वावधाने, तात्या वावधाने,करण वावधाने, नितीन शेळके, शंकर तिपायले, जगन शेळके, बबन वावधाने,धनंजय शेळके,रामनाथ शेळके,लक्ष्मण शेळके,दत्तू वावधाने, संतोष शेळके, श्रावण शेळके, सचिन शेळके, तान्हाजी वावधाने, रमेश तळेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.