कावडीधारकांकडून देवीला जलाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:28 PM2018-10-23T23:28:57+5:302018-10-23T23:30:10+5:30

कळवण : ‘वारी वारी जन्मा मराणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी’ या आरतीतील ओवीप्रमाणेच कावडधारक वारीने आज सप्तशृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी पोहोचले. देशभरातील पवित्र नद्यांच्या जलाने व पुरोहितांच्या मंत्रोच्चारात भगवतीचा जलाभिषेक करण्यात आला. दीड लाखांहून अधिक कावडधारकांचा हा सोहळा डोळ्यात साठवत दीड लाखांहून अधिक भाविक सप्तशृंगी चरणी नतमस्तक झाले. रात्री उशिरापर्यंत जलाभिषेक सोहळा हा सुरू होता.

Devi Jalabhishek from the cottage holders | कावडीधारकांकडून देवीला जलाभिषेक

छबिनामहोत्सव... सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमेनिमित्त मिरवणुकीत सहभागी झालेले श्री.श्री. महामंडलेश्वर पायलगुरु व भाविक.

Next
ठळक मुद्दे कोजागरी पौर्णिमा : देशभरातील नद्यांतून आणले जल

कळवण : ‘वारी वारी जन्मा मराणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी’ या आरतीतील ओवीप्रमाणेच कावडधारक वारीने आज सप्तशृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी पोहोचले. देशभरातील पवित्र नद्यांच्या जलाने व पुरोहितांच्या मंत्रोच्चारात भगवतीचा जलाभिषेक करण्यात आला. दीड लाखांहून अधिक कावडधारकांचा हा सोहळा डोळ्यात साठवत दीड लाखांहून अधिक भाविक सप्तशृंगी चरणी नतमस्तक झाले. रात्री उशिरापर्यंत जलाभिषेक सोहळा हा सुरू होता.
येथील कोजागरी उत्सव नेहमीच आकर्षक ठरतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह गुजरात व मध्य प्रदेशातून हजारो पायी यात्रेने सप्तशृंग गडावर येतात. महिनाभरापासून तर काही जण पंधरा दिवसांपासून विविध नद्यांचे जल सजविलेल्या कमंडलातून घेऊन येतात. अंगात भगवी वस्रे व खांद्यावर कावड घेऊन गेल्या तीन दिवसांपासून कळवण ते नांदुरीचे रस्ते फुलून गेले होते. सोमवारी रात्री नांदुरी मुक्कामी पोहचलेल्या कावडधारकांचा जथा सकाळपासूनच गडाकडे कूच करत होता. नांदुरी ते सप्तशृंगगड या पायी रस्त्यावरचे दृश्य डोळ्यात साठविण्यासारखे होते. हिरवळीने नटलेल्या गडाच्या कुशीतून कावडधारक वाट काढत मार्गक्रमण करत होते.
ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र सूर्यवंशी, देवीभक्त गुलशन पटेल यांच्या हस्ते व व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भगवान नेरकर, भिकन वाबळे, संदीप बेनके पाटील, शांताराम सदगीर यांच्या उपस्थितीत जलाभिषेक करण्यात आला. मध्यरात्रीपर्यंत भगवतीचा जलाभिषेक सुरू होता. कोजागरी उत्सवासह संपूर्ण नवरात्रोत्सव शांततेत व उत्साहात पार पडल्याबद्दल ट्रस्टने भाविकांचे आभार मानले.
तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्यासह सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भिकन वाबळ, भगवान नेरकर, भिकन वाबळे, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके पाटील, शांताराम सदगीर, गिरीश गवळी, राजेश गवळी आदींसह सप्तशृंगगडावरील सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी नवरात्रोत्सव कालावधीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सप्तशृंगीमातेचा जल्लोषपायºयांवर पहाटे ६ वाजेपासूनच गर्दी झाली होती. त्यामुळे दर्शन रांगेतील बाºया लावण्यात आल्या होत्या. कावडधारकांना दुपारनंतर सोडण्यात येणार असल्यामुळे इतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. सायंकाळी कावडधारकांना मंदिरात सोडण्यात आले. मुळा, मुठा, नर्मदा, गोदावरी, तापी, गंगा, यमुना, शिप्रा, गिरणा, मोसम आदी पवित्र नद्यांचे जल घेऊन लाखोंच्या आसपास कावडधारकांनी सप्तशृंगीचा जल्लोष केला.
रात्री बाराला आरती करण्यात आली. दिवसभरात कावडधारकांसह दोन लाख भाविक भगवतीच्या चरणी नतमस्तक झाले. त्यात महिलांचा समावेश अधिक होता. कावडधारकांमध्ये त्र्यंबकेश्वर, नाशिक, असलोद, तळोदा, शहादा, नंदुरबार, इंदूर, उज्जैन, पुणे, भीमाशंकर, सिन्नर, नगर, निफाड, प्रकाशा, कासारे येथील भाविकांचा अधिक समावेश होता. सामाजिक संस्थांकडून कावडधारकांसाठी पाणी व चहाची व्यवस्था करण्यात आली होती.

Web Title: Devi Jalabhishek from the cottage holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.