देवीदास पिंगळे प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा रुग्णालयात
By admin | Published: March 20, 2017 10:26 PM2017-03-20T22:26:13+5:302017-03-20T22:26:13+5:30
रकमेच्या अपहारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले बाजार समिती सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व दिवाळी बोनस फरकाच्या रकमेच्या अपहारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले बाजार समिती सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोमवारी (दि़२०) सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़
म्हसरूळ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या एका कारमधून सुमारे ५८ लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केली होती़ याप्रकरणी कर्मचाऱ्यांसह देवीदास पिंगळे यांच्यावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्याच्या चौकशीसाठी गेलेल्या पिंगळे यांना आॅक्टोबरमध्ये एसीबीने अटक केली होती़
जिल्हा न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात देवीदास पिंगळे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामिनाची मागणी केली होती़ मात्र, कारागृहात वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याने जामीन फेटाळण्यात आला होता़ पिंगळे यांना अनेक आजार असल्यामुळे त्यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे़ त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेतल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ गजानन होले यांनी दिली. देवीदास पिंगळे प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा रुग्णालयात
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व दिवाळी बोनस फरकाच्या रकमेच्या अपहारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले बाजार समिती सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोमवारी (दि़२०) सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़
म्हसरूळ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या एका कारमधून सुमारे ५८ लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केली होती़ याप्रकरणी कर्मचाऱ्यांसह देवीदास पिंगळे यांच्यावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्याच्या चौकशीसाठी गेलेल्या पिंगळे यांना आॅक्टोबरमध्ये एसीबीने अटक केली होती़
जिल्हा न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात देवीदास पिंगळे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामिनाची मागणी केली होती़ मात्र, कारागृहात वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याने जामीन फेटाळण्यात आला होता़ पिंगळे यांना अनेक आजार असल्यामुळे त्यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे़ त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेतल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ गजानन होले यांनी दिली.