देवीदास पिंगळे रुग्णालयात

By admin | Published: March 21, 2017 12:27 AM2017-03-21T00:27:13+5:302017-03-21T00:27:37+5:30

बाजार समिती सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोमवारी (दि़२०) सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़

At Devidas Pingale Hospital | देवीदास पिंगळे रुग्णालयात

देवीदास पिंगळे रुग्णालयात

Next

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व दिवाळी बोनस फरकाच्या रकमेच्या अपहारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले बाजार समिती सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोमवारी (दि़२०) सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़
म्हसरूळ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या एका कारमधून सुमारे ५८ लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केली होती़ याप्रकरणी कर्मचाऱ्यांसह देवीदास पिंगळे यांच्यावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्याच्या चौकशीसाठी गेलेल्या पिंगळे यांना आॅक्टोबरमध्ये एसीबीने अटक केली होती़
जिल्हा न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात देवीदास पिंगळे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामिनाची मागणी केली होती़

Web Title: At Devidas Pingale Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.