देवीदास पिंगळे यांची एसीबीला हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:38 AM2019-07-12T00:38:42+5:302019-07-12T00:40:04+5:30

राष्टÑवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात हजेरी लावल्याने उलटसुलट चर्चा होत असून, यापूर्वीच पिंगळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. तथापि, आपण चौकशीसाठी नव्हे तर काही महत्त्वाची कागदपत्रे एसीबीला देण्यासाठी आलो होतो, असा खुलासा पिंगळे यांनी केला आहे.

Devidas Pingale meets attendance at ACB | देवीदास पिंगळे यांची एसीबीला हजेरी

देवीदास पिंगळे यांची एसीबीला हजेरी

googlenewsNext

नाशिक : राष्टÑवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात हजेरी लावल्याने उलटसुलट चर्चा होत असून, यापूर्वीच पिंगळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. तथापि, आपण चौकशीसाठी नव्हे तर काही महत्त्वाची कागदपत्रे एसीबीला देण्यासाठी आलो होतो, असा खुलासा पिंगळे यांनी केला आहे.
देवीदास पिंगळे यांच्यावर नाशिक बाजार समितीच्या रकमेचा स्वत:साठी वापर केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हा दाखल असून, त्यात पिंगळे यांना अटकही करण्यात आली होती. या गुन्ह्यात सध्या पिंगळे जामिनावर आहेत. गुरुवारी सकाळी पिंगळे हे स्वत: लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी नेमके काय झाले हे सांगण्यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने नकार दिला असला तरी, स्वत: पिंगळे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सन २००९ पासून आपल्या मालमत्तेची उघड चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असून, त्या संदर्भात आपण स्वत:हूनच एसीबीला महत्त्वाची कागदपत्रे सुपूर्द करण्यासाठी आलो होतो. बाजार समितीच्या संदर्भातील गुन्ह्याचा व या चौकशीचा काहीही संबंध नाही.

Web Title: Devidas Pingale meets attendance at ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.