देवळा नगरपंचायतीचा टँकर आपल्या दारी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 07:23 PM2019-05-08T19:23:01+5:302019-05-08T19:23:37+5:30

देवळा : शहरात पीण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईमुळे नागरीक त्रस्त झालेले असतांना देवळा नगरपंचायतीने टँकर तुमच्या दारी ही संकल्पना राबवत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

Devla Nagar Panchayat Tanker undertakes its turn | देवळा नगरपंचायतीचा टँकर आपल्या दारी उपक्रम

देवळा येथे सटाणा रोडवरील एका घरासमोर नगरपंचायतीच्या पाण्याचा टँकर आल्यानंतर पाणी भरतांना त्या घरातील महिला.

Next
ठळक मुद्देदुष्काळ : पाणी पुरवठा सुरु झशल्याने त्रस्त नागरीकांना दिलासा

देवळा : शहरात पीण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईमुळे नागरीक त्रस्त झालेले असतांना देवळा नगरपंचायतीने टँकर तुमच्या दारी ही संकल्पना राबवत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे.
लोहोणेर येथे गिरणा नदीत असलेल्या उद्भव विहीरीवर व कुपनलिकांवर देवळा शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. गिरणा नदीतून हे पाणी सरस्वतीवाडी येथील जलकुंभात टाकण्यात जमा करुन नंतर ते वितरीत केले जाते.
गिरणा नदीला चणकापूर व पुनंद धरणातून पाण्याचे आवर्तन सुटते त्या काळात देवळा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू असतो. परंतु गिरणा नदीचे पात्र कोरडे झाले की शहरात पाणीटंचाई निर्माण होते.
चौकट....
गिरणा नदीला पुढचे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यावर शहराचा पाणीपुरवठा पुर्ववत सुरू होतो. परंतु ह्या आवर्तनांच्या मधील काळात नगर पंचायतीला शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी यातायात करावी लागते. सरस्वती वाडी येथील पाण्याचा जलकुंभ भरला कि शहरात आळीपाळीने सर्व भागात पाणीपुरवठा केला जातो. यामुळे पाणी सोडण्याच्या वेळ जलकुंभ भरण्यावर अवलंबून असते. सद्या आठ दिवसातून अर्धा तास नळांना पाणी येते. परंतु त्याने शहरातील नागरीकांची गरज भागात नाही व पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.
नगरपंचायतीने यातून मार्ग काढत टँकर आपल्या दारी हि संकल्पना राबवत सहा टँकरद्वारे शहर व उपनगरात पाणीपुरवठा सुरू केला आहे. प्रत्येक घरापुढे टँकर उभा करून घरासाठी २०० लिटर पाणी दिले जात आहे. यामुळे टँकरच्या पाण्यासाठी नागरीकांची गर्दी, गोंधळ तसेच पाण्याची नासाडी होत नाही.
घरापुढे टँकर आला कि तेथील महिलांना शांतपणे पाणी भरता येते.
तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी शहराच्या प्रत्येक भागात पाण्याचा टँकर येत असल्यामुळे नागरीकांना पाणीटंचाईच्या झळा सुसहय होत आहेत.
गिरणा नदीला पुढील आवर्तन येईपर्यंत नागरीकांना नगरपंचायतीचे पाण्याचे टँकर मोठा आधार ठरत आहेत.

Web Title: Devla Nagar Panchayat Tanker undertakes its turn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.