देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 01:52 AM2019-12-23T01:52:53+5:302019-12-23T01:53:30+5:30
बागलाणचे आराध्यदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास रविवारपासून (दि.२२) सुरुवात झाली. याचबरोबर पुढील पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवासही उत्साहात प्रारंभ झाला.
सटाणा : बागलाणचे आराध्यदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास रविवारपासून (दि.२२) सुरुवात झाली. याचबरोबर पुढील पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवासही उत्साहात प्रारंभ झाला.
पहाटे ४ वाजता बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, डॉ. सुप्रिया इंगळे-पाटील, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र बागड, अरु णा बागड, नगराध्यक्ष सुनील मोरे, योगीता मोरे, विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष रमेश सोनवणे, कुसुमबाई सोनवणे यांच्या हस्ते देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. महापूजेचे पौरोहित्य राजेंद्र कुलकर्णी, शेखर मुळे, गजानन जोशी, मकरंद पाठक, पंकज इनामदार, संजय चंद्रात्रे, अमोल मुळे, अभय चंद्रात्रे,प्रवीण पाठक, गणेश मुळे, सुदर्शन मुळे, गौरांग जोशी,रोहित देशपांडे, पीयूष गोसावी, चेतन कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, विनय कुलकर्णी, प्रसाद चंद्रात्रे, धनंजय पंडित, ऋ षिकेश चंद्रात्रे आदींनी केले. पप्पू गुरव व शरद गुरव यांनी सनई चौघड्याचे वादन केले. महापूजेनंतर दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
महापूजेप्रसंगी विश्वस्त रमेश देवरे, हेमंत सोनवणे, अॅड. विजय पाटील, राजेंद्र भांगडिया, प्रल्हाद पाटील,कौतिक सोनवणे, सुनील खैरनार, लालचंद सोनवणे, अभिजित बागड, अभिजित सोनवणे, स्वप्नील बागड, नगरसेवक डॉ. विद्या सोनवणे, महेश देवरे, वैभव गांगुर्डे, यशवंत सोनवणे, शिवा सैंदाणे, भगवान सैंदाणे, दत्तू बैताडे, रोशन सोनवणे, नीलेश अमृतकर, योगेश अमृतकर, मंडल अधिकारी जी.डी. कुलकर्णी, तलाठी जयप्रकाश सोनवणे, मनोज भामरे, समाधान पाटील, सेतु संचालक योगेश माळी, नाना देवरे, रमेश सोनवणे, ललित सोनवणे, देवीदास भावसार, शेखलाल मन्सुरी, बाबूलाल मोरे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, बागलाण तहसील कार्यालयात देवमामलेदारांनी ज्या खुर्चीवर बसून जनतेची सेवा केली, त्या खुर्चीची पूजा सकाळी तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, डॉ. सुप्रिया इंगळे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. पोलीस ठाण्याच्या आवारात देवमामलेदारांच्या मंदिरात पहाटे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व अन्नपूर्णा गायकवाड यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
सायंकाळी ४ वाजता आमदार दिलीप बोरसे, उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, तहसीलदार इंगळे-पाटील, नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते सपत्नीक महाराजांच्या रथाचे पूजन होऊन मंदिरापासून रथ मिरवणुकीचा प्रारंभ झाला. पोलीस दलाने रथ ओढण्याचा पहिला मान मिळवला. रथाच्या पुढे लोकनेते पं.ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूल, बेस्ट इंग्लिश मीडिअम स्कूल, व्हीपीएन विद्यालयांची लेजीम पथके होती.