परगावच्या भाविक, पर्यटकांना त्र्यंबकेश्वरबंदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 09:21 PM2020-06-17T21:21:37+5:302020-06-18T00:33:12+5:30
त्र्यंबकेश्वर : सध्या कोसळणाऱ्या जलधारा आणि लॉकडाऊनमुळे नियमांमध्ये आलेल्या शिथिलतेमुळे अनेक भाविक आणि पर्यटकांना त्र्यंबकेश्वरच्या निसर्गाची ओढ लागली आहे. पर्यटन आणि देवदर्शन असा दुहेरी मुहूर्त अनेक जण साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने बाहेरगावच्या पर्यटक आणि भाविकांना पोलिसांकडून रस्त्यातच रोखले जात आहे.
त्र्यंबकेश्वर : सध्या कोसळणाऱ्या जलधारा आणि लॉकडाऊनमुळे नियमांमध्ये आलेल्या शिथिलतेमुळे अनेक भाविक आणि पर्यटकांना त्र्यंबकेश्वरच्या निसर्गाची ओढ लागली आहे. पर्यटन आणि देवदर्शन असा दुहेरी मुहूर्त अनेक जण साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने बाहेरगावच्या पर्यटक आणि भाविकांना पोलिसांकडून रस्त्यातच रोखले जात आहे.
त्र्यंबकेश्वर परिसरातील निसर्गरम्य स्थळे खुलण्यास सुरुवात झाली आहे. रिमझिम असो किंवा
धो धो अशा पावसात भिजण्याचा व डोंगर दºयातून वाहणारे धबधबे झरे, ओढे-नाले खळखळू लागली असून, परिसरावर पसरलेली हिरवाई असे नयनरम्य दृश्य पाहण्याचा मोह अनेकांना होत आहे, पण आता या आनंदाला सर्वांना मुकावे लागणार आहे. त्र्यंबकराजाने आतापर्यंत शहरवासीयांना कोरोनापासून दूर ठेवले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून त्र्यंबकेश्वर शहरातच नव्हे तर परिसरात देखील बाहेरगावची व्यक्ती फिरकू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्र्यंबकेश्वर तालुका चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अडकला आहे.
पहिणे-कोजुल परिसर, वाडीवºहे, आळवंड, टाके, देवगाव परिसर, घोटी परिसर, घोटी पोलीस ठाणे, महिरावणी, तळेगावसह त्र्यंबकेश्वर परिसर, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे व वाघेरा, माळेगाव, चिंचवड, हरसूल, ठाणापाडा हरसूल पोलीस ठाणे, अंबोली घाट मोखाडा पोलीस ठाणे.
---------------------
श्रावण महिन्याकडे लागले लक्ष
दि. २१ जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. २७ जुलै, ३, १० आणि १७ आॅगस्ट असे चार सोमवार तर २० जुलैला आषाढ अमावास्या असून, २१ जुलै ते 20 आॅगस्टपर्यंत श्रावण महिना आहे. म्हणजेच २० आॅगस्टला श्रावण अमावास्या आहे. श्रावणातील ३० दिवसांच्या कार्य काळात दर सोमवारच्या प्रदक्षिणा तथा परिक्र मेसाठी काही लोक रविवारीच त्र्यंबकेश्वरला येत असतात. तर काही जण शनिवारचा उपवास म्हणून दोन दिवस अगोदरच त्र्यंबकेश्वरला येत असतात. तर काही जण रविवार व सुटीचा दिवस म्हणून पिकनिक व देवदर्शनासाठी येतात.
-----------------
निसर्गस्थळे यावर्षी सुनीसुनी : दरवर्षी पहिणे, अंबोली, दुगारवाडी, हरसूल घाटात पर्यटकांच्या गाड्यांची तपासणी करण्यात येते. आता तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर व परिसरात गाड्या अगर दुचाकी आणण्यास अगर लोकांना येण्यासच पोलिसांनी प्रतिबंध केला आहे. त्यामुळे त्र्यंबक व परिसरातील निसर्गस्थळे यावर्षी सुनीसुनी राहणार आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी श्रावणाची परिक्र मादेखील होते की नाही त्याबाबत साशंकता आहे. कारण श्रावण महिन्यात असंख्य शिवभक्त व पर्यटक येथे येत असतात. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. या निसर्गरम्य स्थळांच्या सीमेवरच पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरच्या निसर्ग स्थळांचे दर्शन पर्यटकांना दुर्मीळ होणार आहे.