शिव मंदिरे भक्ताविनारिक्त वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 03:33 PM2020-07-26T15:33:47+5:302020-07-26T15:36:53+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुका हा धार्मिक व सांस्कृतिक जोपासणारा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात अनेक पुरातन मंदिरे आहे. परंतु कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातल्याने तसेच लॉक डाऊनमुळे जमाव बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे ही सर्व मंदिरे आपल्या भक्तांची आतुरतेने वाट पाहत आहे.
लखमापूर : दिंडोरी तालुका हा धार्मिक व सांस्कृतिक जोपासणारा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात अनेक पुरातन मंदिरे आहे. परंतु कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातल्याने तसेच लॉक डाऊनमुळे जमाव बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे ही सर्व मंदिरे आपल्या भक्तांची आतुरतेने वाट पाहत आहे.
श्रावण महिन्यात भगवान शंकराची मोठ्या प्रमाणात पुजा केली जाते. त्यामुळे भाविक, भक्तांची एक पर्वणीच असते. त्यामुळे सर्वच शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी होत असते.
तालुक्यात असे अनेक पुरातन शिव मंदिरे आहे. त्यामध्ये दिंडोरी येथील रामेश्वरी शिव मंदिर, वरखेडा येथील रामेश्वर शिवलिंग मंदिर, देऊळदरा येथील पुरातन मंदिरे, कोशिंबे येथील भद्रेश्वर शिव मंदिर, आंबेगण मधील शिवजी मंदिर, कंरजीमधील शिव मंदिर, राजापूर येथील हेमापंथी शिव मंदिर व तालुक्यात सर्वांत महत्वाचे मंदिर म्हणून ननाशी जवळ असणारे देवघर येथील अतिशय पुरातन महादेव मंदीर आहे.
ननाशी जवळ पुरातन मंदिर हे आज ही देवस्थान मानले जाते. शिवरात्री व श्रावण महिन्यात या ठिकाणी लाखो भाविकांची हजेरी लागत असते .हे शिव स्थान अतिशय प्राचीन मानले जाते. श्रावणात या तिर्थक्षेत्रावर महापुजा, सत्यनारायण, अभिषेक, कायम स्वरु पी होत असतात. त्यामुळे हे तिर्थक्षेत्र भक्तांची आशा पुर्ण करणारे मानले जाते.
दिंडोरी तालुक्यातील हे सर्व शिव मंदिरे अतिशय प्राचीन मानले जातात. त्यामुळे श्रावणात या तिर्थक्षेत्राला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र यंदा कोरोनामुळे ही सर्व तिर्थक्षेत्र कोरोनामुळे बंद ठेवण्याचे आदेश आल्यामुळे श्रावण महिन्यात सर्वच मंदिरे बंद आहेत. यामुळे यंदा श्रावणाच्या पर्व काळात भगवान शिवाचे दर्शन घेणे शक्य नाही. कयामुळे सर्व शिव भक्त व्याकुळ झाले आहे. कोरोनामुळे दिंडोरी तालुक्यामधील श्रावणमासातील नवलाई हिरमूसली आहे.
प्रतिक्रि या...
मी गेली अनेक वर्षांपासून श्रावण मिहना आला की अनेक शिव मंदिरे दर्शनासाठी अखंड जात असतो.आज पर्यंत ?? वर्ष पुर्ण झाली. परंतु यंदा मात्र कोरोना च्या साथीने माझी यंदा अनेक ठिकाणच्या शिव दर्शन केल्यामुळे माझी अवस्था लहान बालका प्रमाणे झाली आहे.
- निवृत्ती बाबा जाधव (शिव भक्त)