सुरगाणा येथे श्रीराम मंदिरात भाविकांनी केले मूर्ती पुजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 04:56 PM2020-08-05T16:56:16+5:302020-08-05T16:58:39+5:30
सुरगाणा : अयोध्या नगरीत श्रीरामाच्या भव्य मंदिर बांधकामाचा भूमीपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा येथील श्रीराम मंदिरात भाविकांनी मुर्तीचे पुजन करून आनंद व्यक्त केला, त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.
सुरगाणा : अयोध्या नगरीत श्रीरामाच्या भव्य मंदिर बांधकामाचा भूमीपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा येथील श्रीराम मंदिरात भाविकांनी मुर्तीचे पुजन करून आनंद व्यक्त केला, त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी भाविकांची प्रभु श्रीरामांप्र्रती श्रद्धा असलेल्या अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्राच्या मंदिर बांधकामाचा भूमीपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अतिशय मंगलमय वातावरणात पार पडत असताना देशभरात श्रीराम मंदिरात भाविकांनी मुर्तीचे पुजन व आरती करून अनेक वर्षांपासून असलेले स्वप्न पूर्ण होत असल्याने आनंद व्यक्त केला आहे.
सुरगाणा येथील संस्थान काळातील असलेल्या श्रीराम मंदिरात देखील ग्रामस्थांनी श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या मुर्तींना पुष्पहार अर्पण करुन पुजन व आरती करण्यात आली.
यावेळी प्रसादाचे वाटप करून जय श्रीराम असा गजर करीत आनंद व्यक्त केला आहे. याप्रसंगी नगरसेवक रमेश थोरात, दिपक थोरात, दिनकर पिंगळे, ज्ञानेश्वर कराटे, रंजना लहरे, तसेच चित्रा जोशी, दिपक खोत, राहुल जोशी, अविनाश खोत, एकनाथ बिरारी, विठ्ठल थोरात, यशवंत देशमुख, कैलास महाले, लाला बारूट, बाळकृष्ण सुर्यवंशी, कानडे, शुभम सोनवणे आदी उपस्थित होते.