विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून स्वतंत्र आधार केंद्रे देवयानी फरांदे : चौदा नवीन केंद्रे सुरू करण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:12 AM2017-12-17T01:12:50+5:302017-12-17T01:13:45+5:30

जेईई परीक्षेसाठी बसणाºया विद्यार्थ्यांना ‘आधार’ची सक्ती करण्यात आली असली तरी, सध्या आधार केंद्रेच नसल्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सोमवारपासून फक्त विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र चार आधार केंद्रे सुरू करण्यात येणार

Devyani Farande: Opportunity to start fourteen new centers | विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून स्वतंत्र आधार केंद्रे देवयानी फरांदे : चौदा नवीन केंद्रे सुरू करण्याचे नियोजन

विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून स्वतंत्र आधार केंद्रे देवयानी फरांदे : चौदा नवीन केंद्रे सुरू करण्याचे नियोजन

Next
ठळक मुद्देनागरिकांची गैरसोय टाळण्याच्या सूचना शासकीय योजनांसाठी आधारची सक्ती

नाशिक : जेईई परीक्षेसाठी बसणाºया विद्यार्थ्यांना ‘आधार’ची सक्ती करण्यात आली असली तरी, सध्या आधार केंद्रेच नसल्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सोमवारपासून फक्त विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र चार आधार केंद्रे सुरू करण्यात येणार असून, याशिवाय आणखी दहा आधार केंद्रे दोन दिवसांत कार्यान्वित करण्यात येणार आहेत. आमदार देवयानी फरांदे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक घेऊन नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या.
केंद्र सरकारकडून सर्वच शासकीय योजनांसाठी आधारची सक्ती करण्यात आली आहे, तथापि नाशिक शहरात बोटावर मोजण्याइतकेच आधार केंदे्र सुरू असल्याने नागरिकांची मोठी रीघ लागू लागली आहे. याशिवाय जेईई परीक्षेसाठी बसणाºया विद्यार्थ्यांना दहावीत असलेल्या त्यांच्या नावाचेच आधार कार्ड व त्यावरील क्रमांक परीक्षेच्या प्रवेशासाठी सक्ती करण्यात आली आहे. मुळात दहावीच्या गुणपत्रकावर विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव अगोदर व नंतर त्याचे व पालकांचे नाव आहे तर आधार कार्डावर अगोदर विद्यार्थ्याचे नाव त्यानंतर पालक व शेवटी आडनावाचा उल्लेख आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यात अडचणी येत आहेत. या परीक्षेसाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत असल्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ उडाली आहे. या गोष्टींची दखल घेत आमदार देवयानी फरांदे यांनी शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांची भेट घेतली व आधारबाबत नागरिकांना येणाºया अडचणींचा ऊहापोह केला. यावेळी जिल्हाधिकाºयांनी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र चार केंद्रे नाशिक महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये सोमवारपासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या तसेच आणखी दहा केंद्रेदेखील महापालिकेच्याच नागरी सुविधा केंद्रावर सुरू करण्याचे आश्वासन दिले.
नागरिकांच्या आधारबाबत असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी १९४७ हा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. नाशिक महापालिकेकडून आधार केंद्रांसाठी पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य मिळत नसल्याने ते मिळण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक बापू सोनवणे, देवदत्त जोशी, सुनील देसाई, शाहीन मिर्झा, हिमगौरी आडके, मुन्ना हिरे, श्याम बडोदे, स्वाती भामरे, दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे, यशवंत निकुळे, शिवा जाधव, कुणाल निफाडकर आदी उपस्थित होते.

Web Title: Devyani Farande: Opportunity to start fourteen new centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.