चांदवडला शेतमजुर संघटनेचा वनकार्यालयावर धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 04:48 PM2018-12-12T16:48:50+5:302018-12-12T16:50:16+5:30

चांदवड : चांदवड येथील वनविभागाच्या कार्यालयावर शेतमजुर संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी धडक मोर्चा काढण्यात आला. तर वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार यांना विविध मागण्याचे निवेदन दिले. चांदवड -देवळा संयुक्त कमेटीच्या वतीने शेतमजुर संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बाजारातील ैहनुमान मंदिराजवळ जमले तेथून त्यांनी संघटनेचे सेक्रेटरी कॉ . भाऊसाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला मोर्चाच्या वतीने सेक्रेटरी भाऊसाहेब मोरे,सीटूचे जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे,सीटुचे इगतपुरी तालुका सदस्य कॉ. मच्छिंद्र गतीर यांची भाषणे झालीत.

Dhadak Morcha of Chandwadra Sangamalaya Organization | चांदवडला शेतमजुर संघटनेचा वनकार्यालयावर धडक मोर्चा

चांदवड वनकार्यालयावर चांदवड व देवळा वनमजुर संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेले वनमजुर व महिला दिसत आहेत.

Next
ठळक मुद्दे वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला

चांदवड : चांदवड येथील वनविभागाच्या कार्यालयावर शेतमजुर संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी धडक मोर्चा काढण्यात आला. तर वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार यांना विविध मागण्याचे निवेदन दिले. चांदवड -देवळा संयुक्त कमेटीच्या वतीने शेतमजुर संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बाजारातील हनुमान मंदिराजवळ जमले तेथून त्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला मोर्चाच्या वतीने सेक्रेटरी भाऊसाहेब मोरे,सीटूचे जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे,सीटुचे इगतपुरी तालुका सदस्य कॉ. मच्छिंद्र गतीर यांची भाषणे झालीत. वीस ते पंचवीस वर्षापासून कसत असलेल्या वनजमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात, चांदवड व देवळा तालुक्यातील वनजमिनी कसणाºयाची फेरचौकशी करुन वनजमिनी नावावर कराव्यात , वनक्षेत्रपाल कार्यालयात प्रथम नोंद (पी.आर.ओ) पंचनामा सही शिक्यासह मिळावे,चांदवडमधील मोरदरे वस्ती गट नंबर ७४३ मध्ये अदिवासी वीस वर्षापासून वनजमिनी कसत असून तेथे वनअधिकाºयांची मनमानी थांबवावी, चांदवड व देवळा तालुक्यातील आदिवासींना सिंगल फेज विजेची परवानगी द्यावी, राजदेरवाडी येथील गट नंबर २२ भामदरी वस्ती येथील ३५ ते ४० कुंटूबासाठी विजेची व पाण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी आदि मागण्याचा निवेदनात समावेश आहे. मोर्चात देवीदास आडोळे, मच्छींद गतीर, भाऊसाहेब मोरे, रुपचंद ठाकरे, देवाजी कुवर, कडू कुवर, सुरेश निकम, अनिल गोधडे, पोपट पवार, काळु शिंदे, गंगाधर जाधव, शांताराम बोरसे, भाऊसाहेब माळी, पप्पु सोनवणे आदिसह शेतमजुर संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील व पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला .

Web Title: Dhadak Morcha of Chandwadra Sangamalaya Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार