इगतपुरी तालुक्यातील ३० गावांत निवडणुकीचे धुमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 04:00 PM2019-02-14T16:00:29+5:302019-02-14T16:00:36+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीने निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. ३० ग्रामपंचायतीच्या २४३ जागांसाठी येत्या मार्चमध्ये निवडणुका घेतल्या जाणार आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजना, दुष्काळी अनुदान, मतदार याद्याची कामे आ िणनिवडणूक नियोजन करता करता तालुक्यातील यंत्रणेवर प्रचंड भार आला आहे. त्यातच तहसील कार्यालयातील रिक्त पदांमुळे निवडणूक यंत्रणेला रात्रीचा दिवस करावा लागणार आहे.

 Dhagashan election in 30 villages of Igatpuri taluka | इगतपुरी तालुक्यातील ३० गावांत निवडणुकीचे धुमशान

इगतपुरी तालुक्यातील ३० गावांत निवडणुकीचे धुमशान

Next
ठळक मुद्देनिवडणूक कामासाठी यंदाही शिक्षकांना सहभागी करावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांचेच्या परिक्षांवर परिणाम होणार आहे.



घोटी : इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीने निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. ३० ग्रामपंचायतीच्या २४३ जागांसाठी येत्या मार्चमध्ये निवडणुका घेतल्या जाणार आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजना, दुष्काळी अनुदान, मतदार याद्याची कामे आ िणनिवडणूक नियोजन करता करता तालुक्यातील यंत्रणेवर प्रचंड भार आला आहे. त्यातच तहसील कार्यालयातील रिक्त पदांमुळे निवडणूक यंत्रणेला रात्रीचा दिवस करावा लागणार आहे. निवडणूक कामासाठी यंदाही शिक्षकांना सहभागी करावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांचेच्या परिक्षांवर परिणाम होणार आहे. असे असले तरी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी इच्छुकांनी जोरदार तयारीसुरू केल्याचे दिसते. लोकसभा विधानसभेची रंगीत तालीम निवडणुकीच्या निमित्तघेतली जाणार आहे.
इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुर्हे, समनेरे, पाडळी देशमुख, नांदूरवैद्य, मालुंजे, मुरंबी, कावनई, कांचनगाव, पिंपळगाव मोर, अधरवड, पिंपळगाव भटाटा, मायदरा धानोशी, इंदोरे, धामणी, देवळे, उभाडे, सोनोशी, म्हसुर्ली, आहुर्ली, धार्नोली, कोरपगाव, रायांबे, शेवगेडांग, खैरगाव, खडकेद, बारशिंगवे, वाकी, बोरटेंभे, शेनवड बुद्रुक, मांजरगावया ३० गावांतील ग्रामपंचायत निवडणुकांनी निवडणुकीचा मोसम सुरू होत आहे. मुदत मागेपुढे संपत असली तरी निवडणुका एकाचवेळी होत आहेत. ३० गावांतील थेट सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या २४३जागांसाठी ही निवडणूक मार्चमध्ये होईल. यानंतर जूनमध्ये ६५ ग्रामपंचायतींच्या ६६० जागांसाठी निवडणूक होईल. ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर लढल्या जात नसल्या तरी गावात कोणत्या गटाची किंवा कोणत्या पक्षाच्या नेत्यांची सत्ता आहे हे सहजपणे ओळखता येते. यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे या पक्षांना उतरत्या क्र माने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही पक्षीय यश मिळाले आहे.

Web Title:  Dhagashan election in 30 villages of Igatpuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.