कुपखेडा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत डाळिंबबाग खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:27 AM2018-03-03T00:27:51+5:302018-03-03T00:27:51+5:30
बागलाण तालुक्यात चौगावपाठोपाठ कुपखेडा येथेही शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे चार एकर डाळिंबबाग खाक झाली आहे. गुरुवारी (दि. १) दुपारी ३ वाजेच्या सुमारास वीज वाहिनीत शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून डाळिंब-बागेला आग लागली. यात दहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सटाणा : बागलाण तालुक्यात चौगावपाठोपाठ कुपखेडा येथेही शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे चार एकर डाळिंबबाग खाक झाली आहे. गुरुवारी (दि. १) दुपारी ३ वाजेच्या सुमारास वीज वाहिनीत शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून डाळिंब-बागेला आग लागली. यात दहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कुपखेडा येथील उषाबाई सखाराम जगताप यांच्या दोधेश्वर शिवारातील गट नंबर १२५/३ मध्ये चार एकर डाळिंबब आहे. यात पाच वर्षांपूर्वी १५२० डाळिंबरोपांची लागवड केली होती. त्यासाठी ठिबक सिंचन करण्यात आले होते. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक शेतातून जाणाºया विद्युत वाहिनीजवळ शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून भीषण आग लागली. डाळिंबबागेत मोठ्या प्रमाणात गवत असल्यामुळे क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. आजूबाजूच्या शेतकºयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र संपूर्ण बाग आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने उद्ध्वस्त झाली. या आगीत डाळिंबाची झाडे, ठिबक संच असे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले. वीज महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी संतप्त असून, शेती व्यवसायावर गुजराण करणारे कुटुंब अशा घटनांमुळे उद्ध्वस्त झाले आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून या कुटुंबाला उभे करण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महिला शेतकरी उषाबाई जगताप यांनी केली आहे. तेल्यासारख्या महाभयंकर रोगाशी सामना करून शेतकरी डाळिंब पीक जतन करत आहेत. त्यात पाणीटंचाई आणि कवडी-मोल मिळणारा भाव यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्ज-बाजारी होत असताना वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे डाळिंबबागांना आग लागून शेतकºयांचे कुटुंबाचे कुटुंब देशोधडीला लागत आहेत.
च्चौगाव व कुपखेडा येथे डाळिंबबागेला लागलेल्या आगीच्या घटना बागलाण-वासीयांसाठी नवीन नाही. यापूर्वी अनेक घटना घडल्या मात्र आजूनही अनेक पीडित शेतकºयांना भरपाई मिळाल्याचे उदाहरण नाही. शासनाने शेतकºयाला उभे करण्यासाठी तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.