धनगर आरक्षणासाठी आयुक्तालयावर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:06 AM2018-08-14T01:06:11+5:302018-08-14T01:06:30+5:30

धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करण्यात यावे व इतर विविध मागण्यांसाठी धनगर सेवा समाज संस्थेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

 Dhanagar reservation | धनगर आरक्षणासाठी आयुक्तालयावर धरणे

धनगर आरक्षणासाठी आयुक्तालयावर धरणे

Next

नाशिकरोड : धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करण्यात यावे व इतर विविध मागण्यांसाठी धनगर सेवा समाज संस्थेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.  यावेळी सोलापूर विद्यापीठात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, मेंढपाळांना मेंढ्या चरण्यासाठी राखीव कुरण करण्यात यावी, गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी धनगर समाज सेवा संस्थेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये नवनाथ ढगे, रामदास भांड, शिरीष चव्हाण, एस. एस. वाघ, सुनील ओढेकर, शशिकांत वाघ, नितीन धानापुने, अप्पा माने, आबा सोनवणे, श्रावण शेंडगे, नवनाथ शिंदे, ऋषिकेश शिंदे, आशा जाधव, सुशील वाघ, लता मरकड, पार्वती काटकर आदी सहभागी झाले होते.
अशा आहेत मागण्या
आरक्षणाच्या एसटी सूचीमध्ये अनुक्रमांक ३६ वर घटनेत ओराण, धनगर शब्द होता. तो शब्द आता घिला धनगड म्हणून आहे. महाराष्टÑात कोणत्याही भागात धनगड ही जमात नसून तीच जमात धनगर आहे. आरक्षणामध्ये धनगड शब्द दुरुस्त करून धनगर करण्यात यावा. त्यामुळे धनगर समाजाला एसटी सवलतीचा लाभ मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title:  Dhanagar reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा