सोडूनी घडाळ्याची साथ, दिंडोरीचे धनराज महाले शिवबंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 02:26 PM2019-08-16T14:26:53+5:302019-08-16T14:33:09+5:30

नाशिक- गेल्या लोकसभा निवडणूकीत दिंडोरी मतदार संघातून राष्टÑवादी कॉँग्रेसने पक्षातील निष्ठावान महिलेला उमेदवारी डावलून ज्या शिवसेनेच्या धनराज महाले यांन अल्पकाळात या पक्षाची साथ सोडली असून शिवसेनेत प्रवेश केला आहे. शुक्रवारी (दि. १६) मुंबईत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. दुसरीकडे नाशिकमधील भाजपाच्या महापौर रंजना भानसी यांचे बंधू असलेल्या दिलीप राऊत यांनीही सेना जवळ केली आहे. तर दुसरीकडे इगतपुरीतील कॉँग्रेस पक्षाच्या आमदार निर्मला गावीत देखील शिवसेनेच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.

Dhanraj Mahale Shivbandhan of Dindori along with Soduni watch | सोडूनी घडाळ्याची साथ, दिंडोरीचे धनराज महाले शिवबंधनात

सोडूनी घडाळ्याची साथ, दिंडोरीचे धनराज महाले शिवबंधनात

Next
ठळक मुद्देराष्टÑवादी कॉँग्रेसला धक्का  महापौरांचे बंधुंचाही सेना प्रवेश कॉँग्रेस आमदार निर्मला गावितांच्या पक्षांतराचीही चर्चा

नाशिक- गेल्या लोकसभा निवडणूकीत दिंडोरी मतदार संघातून राष्टÑवादी कॉँग्रेसने पक्षातील निष्ठावान महिलेला उमेदवारी डावलून ज्या शिवसेनेच्या धनराज महाले यांन अल्पकाळात या पक्षाची साथ सोडली असून शिवसेनेत प्रवेश केला आहे. शुक्रवारी (दि. १६) मुंबईत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. दुसरीकडे नाशिकमधील भाजपाच्या महापौर रंजना भानसी यांचे बंधू असलेल्या दिलीप राऊत यांनीही सेना जवळ केली आहे. तर दुसरीकडे इगतपुरीतील कॉँग्रेस पक्षाच्या आमदार निर्मला गावीत देखील शिवसेनेच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.

विधानसभा निवडणूका तोंडावर आल्याने राजकिय घडामोडींना वेग आला आहे. शुक्रवारी (दि.१६) राष्टÑवादीचे धनराज महाले यांनी शिवबंधन बांधले. त्यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे तसेच जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत उपस्थित होते.

निधर्मी जनता दलाचे माजी खासदार (कै.) हरीभाऊ महाले यांचे चिरंजीव असलेले धनराज महाले यापूर्वीही शिवसेनेत होते. दिंडोरी मतदार संघातून ते शिवसेनेचे आमदार होते. गेल्या लोकसभा निवडणूकीत दिंडोरी लोकसभा मतदार संघातून राष्टÑवादीने त्यांना उमेदवारी दिली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवून पराभूत झालेल्या डॉ. भारती पवार यांना डावलूून राष्टÑवादीने महाले यांना संधी दिली. मात्र भाजपाने भारती पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी महाले यांचा दणदणीत पराभव केला होता. परंतु राष्ट्रवादीत त्यांना न थांबता विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाले यांनी परत शिवबंधन बांधले. युतीच्या जागा वाटपात दिंंडोरी विधान सभा राष्टÑवादीच्या वाटेला होता. सध्या त्या ठिकाणी राष्टÑवादीचे नरहरी झिरवाळ हे आमदार आहेत.

दुसरीकडे दिंडोरीतीलच भाजपाचे माजी खासदार कचरू भाऊ राऊत यांचे चिरंजीव दिलीप राऊत यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. नाशिकमधील भाजपाच्या महापौर रंजना भानसी यांचे ते सख्खे बंधु आहेत.
दरम्यान, इगतपुरी- त्र्यंबक विधानसभा मतदार संघातून दोनवेळा निवडणूक आलेल्या कॉँग्रेसच्या आमदार निर्मला गावीत या देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे तालुक्याच्या हितासाठी आपण कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ असे त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Dhanraj Mahale Shivbandhan of Dindori along with Soduni watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.