कमको बँकेच्या अध्यक्षपदी धर्मराज मुर्तडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 06:34 PM2020-02-20T18:34:33+5:302020-02-20T18:34:57+5:30

दि कळवण मर्चंट्स को-आॅप. बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. धर्मराज मुर्तडक, तर उपाध्यक्षपदी आदिवासी नेते पोपटराव बहिरम, जनसंपर्क संचालकपदी योगेश मालपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Dharmaraj Murtadak as President of Kamco Bank | कमको बँकेच्या अध्यक्षपदी धर्मराज मुर्तडक

कमको बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. धर्मराज मुर्तडक, उपाध्यक्षपदी पोपटराव बहिरम, जनसंपर्क संचालकपदी योगेश मालपुरे यांच्या निवडीप्रसंगी सुनील महाजन, निंबा कोठावदे, राजेंद्र अमृतकार, प्रवीण संचेती, गजानन सोनजे आदी.

googlenewsNext

कळवण : दि कळवण मर्चंट्स को-आॅप. बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. धर्मराज मुर्तडक, तर उपाध्यक्षपदी आदिवासी नेते पोपटराव बहिरम, जनसंपर्क संचालकपदी योगेश मालपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दि कळवण मर्चंट्स को-आॅप. बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रा. निंबा कोठावदे, उपाध्यक्ष राजेंद्र अमृतकार यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गायकवाड यांनी काम पाहिले. अध्यक्षपदाकरिता डॉ. धर्मराज मुर्तडक, तर उपाध्यक्षपदाकरिता आदिवासी नेते पोपटराव बहिरम यांनी नामांकन दाखल केले. कार्यकर्त्यांनी बँकेसमोर फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. निवडीप्रसंगी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीला बँकेचे मावळते अध्यक्ष प्रा. निंबा कोठावदे, राजेंद्र अमृतकार, सुनील महाजन, प्रवीण संचेती, नितीन वालखडे, गजानन सोनजे, योगेश मालपुरे, प्रभाकर विसावे, भारती कोठावदे, शालिनी महाजन उपस्थित होते.

Web Title: Dharmaraj Murtadak as President of Kamco Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.