कंत्राटी कामगारांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 10:36 PM2019-09-10T22:36:18+5:302019-09-10T22:36:48+5:30

सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान नॅशनल ग्लास लिमिटेड कारखान्यातील १२८ कंत्राटी कामगारांचे नऊ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु आहे.

Dharna agitation of contract workers | कंत्राटी कामगारांचे धरणे आंदोलन

सिन्नरजवळील माळेगाव औद्योगिक वसाहतीतल्या हिंदुस्थान नॅशनल ग्लास लिमिटेड कारखान्याच्या प्रवेशद्वाराबाहेर धरणे आंदोलन करणाऱ्या कामगारांसोबत चर्चा करताना खासदार हेमंत गोडसे.

Next
ठळक मुद्दे१२ कामगारांनी एक तास आंदोलन केल्याने संतप्त झालेल्या व्यवस्थाने ‘त्या’ कामगारांना निलंबित केले.

सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान नॅशनल ग्लास लिमिटेड कारखान्यातील १२८ कंत्राटी कामगारांचे नऊ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु आहे.
दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेतन कराराकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यापैकी १२ कामगारांनी एक तास आंदोलन केल्याने संतप्त झालेल्या व्यवस्थाने ‘त्या’ कामगारांना निलंबित केले. संबंधित कामगारांचे निलंबन मागे घ्यावे म्हणून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असतानाच उर्वरित कामगारांचीही वेतन कपात करून अटी-शर्ती लादल्याने कामगारांनी कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन सुरू केले आहे. सर्व स्थानिक कामगार असून त्यांच्यावर कारखाना व्यवस्थापनाकडून अन्याय होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कारखान्यातील हे कामगार गेल्या २३ वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून काम करीत आहेत. जुना एल अ‍ॅण्ड टी कारखाना हिंदुस्थान नॅशनल ग्लासने विकत घेतल्यानंतर हे कामगार नव्या कारखान्याकडे वर्ग झाले होते. हे कामगार ‘सिटू’ या मान्यताप्राप्त संघटनेचे सभासद आहेत. कंत्राटी कामगार व व्यवस्थापन यांच्यात त्रैवार्षिक वेतन करार केला जातो. मात्र, करार संपून पुन्हा तीन वर्षे लोटली तरी व्यवस्थापन नव्या करारावर बोलणी करीत नसल्याने काही कामगारांनी महिनाभरापूर्वी तासभरासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले होते.२२ वर्षांची सेवा खंडित करता येणार नाही व्यवस्थापनाने आंदोलनात पुढाकार घेणाºया १२ कामगारांना निलंबित करून त्यांची अंतर्गत चौकशी सुरू केली. दरम्यानच्या काळात कारखान्याच्या प्रवेशद्वारावर या कामगारांचा रोज बेसिक १०५ रु पयांनी कमी करणे, कॅन्टीन सेवा बंद करणे, युनियनचा राजीनामा देणे या अटी मान्य असल्यास कामावर येण्याबाबत लावल्याने कामगारांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे.
आंदोलनकर्त्या कामगारांची खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे यांनी भेट घेतली. प्रश्न १२ कामगारांचा असताना अन्य कामगारांना त्रास का? असा सवाल त्यांनी व्यवस्थापनाला केला. त्यावर चौकशी पूर्ण होऊ द्या, त्यानंतर निर्णय घेऊ असे व्यवस्थापनाने सांगितले. कामगार उपायुक्त विकास माळी यांनी कामगारांची २२ वर्षांची सेवा खंडित करता येणार नाही, किरकोळ कारणावरून कामगारांचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका, असे सांगूनही व्यवस्थापनाने अद्याप निर्णय घेतला नसल्याचे समजते.

Web Title: Dharna agitation of contract workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.