मालेगावी व्यापाऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 11:09 PM2020-01-02T23:09:19+5:302020-01-02T23:09:58+5:30

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील भूखंडावर राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत उभारण्यात येणाºया १ हजार मेट्रीक टन क्षमतेच्या गुदामाला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. गुरुवार पासून बेमुदत बंद पुकारुन बाजार समितीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. बंद व आंदोलनामुळे बाजार समितीचे सुमारे दररोजची ९० लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती.

Dharna agitation for Malegaon traders | मालेगावी व्यापाऱ्यांचे धरणे आंदोलन

मालेगाव कृउबा आवारातील मोकळ्या भूखंडावर गुदाम उभारु नये या मागणीसाठी लिलाव बंद ठेवून धरणे आंदोलन करताना किशोर सोनवणे, भिका कोतकर, देवीदास वाघ, संजय घोडके, फकीरा शेख, रामदास बोरसे, मापारी गटाचे संचालक वसंत कोर, हिरालाल वाघ, दिलीप अभोणकर, नथू वाघ, कैलास तिसगे, निहालहाजी बागवान, विलास सोनवणे, संजय पाटील, निंबा मोरे, प्रशांत सोनवणे, नितीन सोनवणे आदी.

Next
ठळक मुद्देबाजार समिती : लिलाव बंद; मोकळ्या भूखंडावर गुदाम व गाळे उभारण्यास विरोध

मालेगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील भूखंडावर राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत उभारण्यात येणाºया १ हजार मेट्रीक टन क्षमतेच्या गुदामाला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. गुरुवार पासून बेमुदत बंद पुकारुन बाजार समितीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. बंद व आंदोलनामुळे बाजार समितीचे सुमारे दररोजची ९० लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती.
बाजार समितीच्या मोकळ्या भूखंडावर राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत १ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गुदाम उभारणीला पणन विभागाने मंजुरी दिली आहे. सदर गुदाम उभारणीला १ कोटी ९ लाख ५७ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यात बाजार समिती ४७.७८ लाख तर पणन विभाग ५३.२२ लाख अर्थसहाय्य करणार आहे. शेतकºयांना आपला माल या गुदामात ठेवता येणार आहे. त्या मालाच्या सुरक्षतेची हमी बाजार समितीकडे राहणार आहे. या गुदाम उभारणीला भाजीपाला फळफळावळ मार्केट युनियन, व्यापारी असोसिएशनाने विरोध दर्शविला आहे. बाजार समिती आवारात जागेची कमतरता आहे. टरबुज, कैरी व इतर फळांच्या लिलावासाठी जागेचा वापर केला जातो. सदर जागेवर गुदाम उभारल्यास शेतकºयांच्या मालाचा लिलाव करण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही.
बाजार समितीने व्यापारी गाळे व गुदाम इतरत्र ठिकाणी बांधावेत, अशी मागणी व्यापाºयांनी केली आहे. या मागणीसाठी बेमुदत संप पुकारुन धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते.
आंदोलनात किशोर सोनवणे, भिका कोतकर, देवीदास वाघ, संजय घोडके, फकीरा शेख, रामदास बोरसे, मापारी गटाचे संचालक वसंत कोर, हिरालाल वाघ, दिलीप अभोणकर, नथू वाघ, कैलास तिसगे, निहालहाजी बागवान, विलास सोनवणे, संजय पाटील, निंबा मोरे, प्रशांत सोनवणे, नितीन सोनवणे, राजूभाई फ्रुटवाले, अन्नु शेठ आदिंसह, भाजीपाला फळफळावण मार्केट युनियन, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

९० लाखांची उलाढाल ठप्प; आडत दुकाने बंद
कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापार गुरुवारी ठप्प झाल्यामुळे सुमारे ९० लाखांची उलाढाल थंडावली होती. बाजार समितीलाही दररोजच्या ८५ हजार रुपये मार्केट शुल्काला मुकावे लागले. गुरूवारी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शुकशुकाट पसरला होता. आंदोलनकर्ते व बाजार समिती प्रशासनामध्ये तडजोड झाली नसल्यामुळे आंदोलन सुरूच होते.

शेतकºयांचे धान्य व इतर माल विनामूल्य उभारण्यात येणाºया गुदामात ठेवले जाणार आहे. बाजारभाव कमी झाल्यावर शेतकºयांना दीर्घकाळ आपला माल गुदामात ठेवण्याची सोय केली जाणार आहे. शेतकºयाच्या मालाच्या सुरक्षेची हमी बाजार समिती प्रशासनाकडे राहणार आहे. गुदाम उभारणीसाठी शासनाने निधी देखील दिला आहे. शासनाच्या योजनेला व्यापाºयांकडून विनाकारण विरोध केला जात आहे. शेतकरी हिताचा निर्णय घेणे गरजेचे आहे.
- सुनील देवरे
(उपसभापती कृउबा, मालेगाव)

Web Title: Dharna agitation for Malegaon traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.