युवा जनता दलाचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:59 PM2020-02-26T23:59:49+5:302020-02-27T00:01:10+5:30

मालेगाव मध्य : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीचा ठेका रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी युवा जनता दलातर्फे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

Dharna agitation of young Janata Dal | युवा जनता दलाचे धरणे आंदोलन

मालेगावी वॉटरग्रेस कंपनीचा ठेका रद्द करावा, या मागणीसाठी जनता दलातर्फे मनपा प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करताना मुस्तकीम डिग्निटी, आरीफ हुसैन, नगरसेवक मन्सूर अहमद, अब्दुल बाकी, सलीम गडबड, मुस्लीम धांडे, आफताब आलम, अब्दुल रहेमान अन्सारी, अबुलैस अन्सारी व कार्यकर्ते.

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव मध्य : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीचा ठेका रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी युवा जनता दलातर्फे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
शहरातील कचरा संकलन करणाºया वॉटरग्रेस कंपनीला मनपाकडून महिन्याकाठी सुमारे ८० लाख रुपये अदा केले जातात; मात्र शहरातील कचºयाची अवस्था ‘जैसे थे’च आहे. वॉटरग्रेस कंपनीकडून मनपासोबत झालेल्या करारनाम्यातील अनेक अटी व शर्तींचा भंग करण्यात येत आहे. त्यामुळे सदर ठेका रद्द करण्यात यावा, अशी मागणी जनता दलाचे दिवंगत नेते तथा महागठबंधनचे गटनेता बुलंद एकबाल यांनी महासभेत केली होती. त्यानुसार महासभेत २०१८ मध्येच चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर रशिद शेख यांनी दिले होते. याप्रकरणी चौकशी पूर्ण करीत चौकशी अहवाल मनपा प्रशासनास सादर करण्यात आला होता, परंतु हेतुपुरस्सर अहवाल दडपण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आल्याने महागठबंधनच्या गटनेत्या शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी पत्रकार परिषद घेऊन चौकशी अहवालात वॉटरग्रेस कंपनीकडून कामातील त्रुटी, अटी-शर्तीचा भंग करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे स्पष्ट उल्लेख असल्याने ठेका त्वरित रद्द करण्याची मागणी केली होती.
आंदोलनात आरीफ हुसैन, मुस्तकीम डिग्निटी, मन्सूर अहमद शब्बीर अहमद, अब्दुल बाकी, गिरीश बोरसे, अबुलैस अन्सारी, आफताब आलम, अनिस शेख, अब्दुल रहेमान अन्सारी, मोहंमद सलीम गडबड यांनी सहभाग घेतला. महापौर ताहेरा शेख यांनी वॉटरग्रेसचा ठेका रद्द करण्याबाबत ठरावाचा समावेश १८ फेब्रुवारीच्या महासभेत केला होता, मात्र सत्ताधाºयांकडून ठेका रद्द न करता अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करून महासभाच तहकूब करण्याची खेळी खेळण्यात येऊन वॉटरग्रेसला अन्य कारणास्तव मोकळीक देण्यात आली. त्यामुळे मनपाच्या तिजोरीवर आणखी भार पडणार आहे, असा आरोप मुस्तकीम डिग्निटी यांनी सत्ताधाºयांवर केला आहे.

Web Title: Dharna agitation of young Janata Dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.