पेठ तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:13 AM2021-02-07T04:13:32+5:302021-02-07T04:13:32+5:30

पेठ : केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी कृषी कायद्यांचा निषेध करत पेठ तालुका किसान सभा, जनवादी महिला संघटना, माकपा व डीवायएफआय ...

Dharne agitation in front of Peth tehsil office | पेठ तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

पेठ तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Next

पेठ : केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी कृषी कायद्यांचा निषेध करत पेठ तालुका किसान सभा, जनवादी महिला संघटना, माकपा व डीवायएफआय यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.

माकपाचे तालुकाध्यक्ष कॉ. देवराम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हातात लाल झेंडे व घोषणा देत पेठ शहरातून मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने शेतकरीविरोधी आडमुठे धोरण अवलंबल्याने देशभरातील शेतकरी संतापला आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला यावेळी जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष डॉ. देवराम गायकवाड, तालुका सेक्रेटरी कॉ. नामदेव मोहांडकर, कॉ. मुरलीधर निंबेकर, गुलबा चौधरी, प्रभाकर गावीत, जाकीर मनियार, तारा दुदे, ताई राथड, सिता भोये, तुळसा दरोडे, उत्तम महाले, रामभाऊ गहले, अमृता फसाळे, चंदर धुळे, तुकाराम गवळी, विठ्ठल मानभाव, रामभाऊ बोके यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

------------------

पेठ तालुका किसान सभेच्या वतीने धरणे आंदोलनप्रसंगी उपस्थित डॉ. देवराम गायकवाड, नामदेव मोहांडकर, मुरलीधर निंबेकर, गुलबा चौधरी, प्रभाकर गावीत, जाकीर मनियार आदी. (०६ पेठ तहसील)

===Photopath===

060221\06nsk_6_06022021_13.jpg

===Caption===

०६ पेठ तहसील

Web Title: Dharne agitation in front of Peth tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.