उदे गं अंबे उदे...दोन हजार किलो शेंदूर हटविल्याने श्री सप्तशृंगी देवीचे मूळ रूपात दर्शन

By संजय पाठक | Published: September 9, 2022 10:47 AM2022-09-09T10:47:56+5:302022-09-09T10:49:36+5:30

देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील श्री सप्तशृंगी देवीच्या मूर्तीच्या संवर्धनाचे कामकाज 21 जुलैपासून सुरू झाले होते

Dharshan of Shri Saptashringi Devi in her original form after removing two thousand kilos of shendur | उदे गं अंबे उदे...दोन हजार किलो शेंदूर हटविल्याने श्री सप्तशृंगी देवीचे मूळ रूपात दर्शन

उदे गं अंबे उदे...दोन हजार किलो शेंदूर हटविल्याने श्री सप्तशृंगी देवीचे मूळ रूपात दर्शन

googlenewsNext

नाशिक-

देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील श्री सप्तशृंगी देवीच्या मूर्तीच्या संवर्धनाचे कामकाज 21 जुलैपासून सुरू झाले होते. आता या मूर्तीवरील सुमारे 2 हजार किलो शेंदूर कवच काढण्यात आले असून त्यामुळे देवीचे मूळ स्वरूप दिसू लागले आहे पारंपारिक देवी मूर्ती पेक्षा हे स्वरूप वेगळे असून अत्यंत मोहक मूर्ती दिसत असल्याने भाविकांच्या डोळ्यांचे पाणी फिटले.

वणी येथील सप्तशृंगी देवीच्या गडावर महाराष्ट्रातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. ही देवी उत्तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी  देवी मानली जाते.
काल पासून या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला. त्यामुळे मूर्तीचे मूळ स्वरूप एक दिवसासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांच्या साठी खुले करण्यात आले होते 45 दिवसात देवी मंदिराच्या भोवती महिरापाचे सुशोभीकरण करताना मूर्तीवरील शेंदूर काढण्याचं काम करण्यात आलं. पुरातत्त्व खात्याच्या नियमाचे आणि निकषांचे पालन करून कोणत्याही रसायनांचा वापर न करता हे काम पूर्ण करण्यात आलं. देवीच्या नव्या स्वरूपात हातातील आयुद्धांत मध्ये प्रचंड बदल झालेला दिसतो यापूर्वी 1768 मध्ये देवी वरचा खोळ म्हणजे शेंदूर पडल्याची ऐतिहासिक नोंद पेशवे दप्तरी आहे त्यानंतर आता प्रथमच शेंदूर काढण्यात आल्याने देवीचे वेगळे आणि मोहक स्वरूप दिसू लागले आहे.

देवी मूर्ती संवर्धन हे अतिशय काळजीपूर्वक पुरातत्त्व संकेतानुसार व निर्धारित कालावधीत नाशिकच्या अजिंक्यतारा कन्सल्टंट्सने पूर्ण केले आहे. या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संवर्धन वास्तु विशारद स्मिता कासार पाटील  यांच्या नेतृत्वाखाली मुख्य संवर्धक डॉ मॅनेजर सिंग तसेच
संचालक योगेश कासार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य मूर्तिकार किशोर सोनवणे तसेच सतीश सन्नानसे,  समाधान आमले,  प्रकाश ठाकरे, गौरव ठाकरे, धनंजय पळसेकर,  सिद्धांत वाजे यांनी हे काम पूर्ण केले आहे.

Web Title: Dharshan of Shri Saptashringi Devi in her original form after removing two thousand kilos of shendur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.