धोबी समाजाला वीज दरामध्ये सवलत मिळावी
By admin | Published: March 7, 2017 01:39 AM2017-03-07T01:39:35+5:302017-03-07T01:39:47+5:30
नाशिक : धोबी समाजाच्या पारंपरिक लाँड्री व्यवसायाला वीज दरामध्ये सवलत मिळावी, अशी मागणी डी. डी. सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आली
नाशिक : धोबी समाजाच्या पारंपरिक लाँड्री व्यवसायाला वीज दरामध्ये सवलत मिळावी, अशी मागणी राज्य परीट- धोबी
सेवा मंडळाचे अध्यक्ष डी. डी. सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष अनिल शिंदे, महासचिव दिलीप शिरपूरकर, संघटन सचिव हरिष मस्के, क्रीडा व कला अध्यक्ष मनोज मस्के, दत्ताजी यादव तसेच संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मागणीचे
निवेदन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा होऊन निवेदन देण्यात आले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धोबी परीट समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला असून, त्याच्या विकासासाठी सरकारने प्रयत्न करावे.
बावनकुळे यांनी संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून या समाजाला वीज दरामध्ये सवलत मिळाली पाहिजे, अशी सकारात्मक चर्चा करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉड्री व्यवसाय करणारे समाज बांधवांची संख्या व इतर माहिती जमा करून तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)