‘धोडप’चे निसर्ग पर्यटन केंद्र सज्ज

By Admin | Published: January 3, 2017 01:49 AM2017-01-03T01:49:28+5:302017-01-03T01:49:47+5:30

‘इको टुरिझम’साठी वनविभाग प्रयत्नशील : सोयीसुविधांसह साकारले अ‍ॅडव्हेंचर पार्क

'Dhodap' Nature Tourism Center Ready | ‘धोडप’चे निसर्ग पर्यटन केंद्र सज्ज

‘धोडप’चे निसर्ग पर्यटन केंद्र सज्ज

googlenewsNext

नाशिक : ‘गडकोट, निसर्ग आणि कॅम्पसाइटची वारी... निर्णयक्षमता, जिद्द आणि साहसासाठी भारी...’ चला तर मग करुया सातवाहन काळापासून तर इंग्रजांपर्यंत अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या ‘धोडप’च्या कुशीत जाण्याचा वीकेण्ड प्लान. नाशिकच्या वनविभागाने (पूर्व) धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हट्टी गावालगत उभारलेले निसर्ग पर्यटन केंद्र निसर्गप्रेमी पर्यटकांना खुणावत आहे.  चांदवड तालुक्यातील हट्टी गावातील गावकऱ्यांच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या सहकार्याने वनविभागाने ग्रामविकास, जिल्हा नियोजन विकास व बिगर आदिवासी योजनेअंतर्गत २०१५ सालापासून निसर्ग पर्यटन व साहसी क्र ीडा पार्कचा प्रकल्प हाती घेतला. वर्षभरात हा प्रकल्प पूर्णत्वास आला असून, या ठिकाणी पर्यटकांसाठी प्राथमिक सुविधांसह साहसी क्रीडा प्रकार (अ‍ॅडव्हेंचर पार्क) उपलब्ध करून देण्यात आले आहे. राज्य शासनाच्या निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या धोरणांतर्गत वन विभागाकडून जिल्ह्यातील विविध गावांमध्ये इको टुरिझम संकल्पना राबविली जात असून, या माध्यमातून स्थानिकांना रोजगार व वनसंवर्धनाला चालना दिली जात आहे.  दुर्ग, गड, किल्ले, वन्यजीव, निसर्गाची जैवविविधता माहिती व्हावी, यासाठी वनविभागाने शासनाच्या मार्गदर्शनानुसार ‘इको टुरिझम’ संकल्पनेच्या वाटेवर दमदार पाऊल ठेवले आहे. याचा प्रत्यय हट्टी येथील निसर्ग पर्यटन केंद्राला दिलेल्या भेटीत आला. हट्टीच्या गावकऱ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या आणि गावाचा विकास साधला जावा, तसेच गावाच्या परिघामध्ये असलेल्या वनसंपदेचे संरक्षण व्हावे, या मुख्य उद्देशाने वनविभागान सुमारे सात एकर क्षेत्रावर २०१५ साली विविध विकासकामांना सुरुवात करत निसर्ग पर्यटन केंद्राची मुहूर्तमेढ रोवली.

Web Title: 'Dhodap' Nature Tourism Center Ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.