ढोली तारो, सोनू, झिंगाट गाण्यांचा जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:24 AM2017-09-16T00:24:15+5:302017-09-16T00:24:21+5:30

नवरात्र म्हटल्याबरोबर बुद्धी-शक्तीचे प्रतीक असणाºया देवींच्या उपासनेसह बेभान होऊन गरबा, दांडिया खेळणारे भाविक डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. ताला-सुरात, लयीत खेळल्या जाणाºया टिपºया, गरबा यांना ध्वनिक्षेपकाद्वारे दिली जाणारी अर्थपूर्ण, दणदणाटासह असणारी गाणी महत्त्वाची ठरतात. यंदाच्या नवरात्रोत्सवात अशाच नव्या-जुन्या, मराठी, बॉलिवूड, वेस्टर्न गाण्यांचा बोलबाला बघायला मिळणार असून, राज्यात बहुतेक ठिकाणी डीजेला बंदी असली तरी ध्वनिप्रदूषण होऊ न देता आवाजाची पातळी सांभाळणारे ध्वनिक्षेपक वापरून याचा आस्वाद भाविकांना घेता येणार आहे.

 Dholle Taaro, Sonu, Zingat Songs Thrust | ढोली तारो, सोनू, झिंगाट गाण्यांचा जोर

ढोली तारो, सोनू, झिंगाट गाण्यांचा जोर

googlenewsNext

नाशिक : नवरात्र म्हटल्याबरोबर बुद्धी-शक्तीचे प्रतीक असणाºया देवींच्या उपासनेसह बेभान होऊन गरबा, दांडिया खेळणारे भाविक डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. ताला-सुरात, लयीत खेळल्या जाणाºया टिपºया, गरबा यांना ध्वनिक्षेपकाद्वारे दिली जाणारी अर्थपूर्ण, दणदणाटासह असणारी गाणी महत्त्वाची ठरतात. यंदाच्या नवरात्रोत्सवात अशाच नव्या-जुन्या, मराठी, बॉलिवूड, वेस्टर्न गाण्यांचा बोलबाला बघायला मिळणार असून, राज्यात बहुतेक ठिकाणी डीजेला बंदी असली तरी ध्वनिप्रदूषण होऊ न देता आवाजाची पातळी सांभाळणारे ध्वनिक्षेपक वापरून याचा आस्वाद भाविकांना घेता येणार आहे. सीडी, डिव्हीडी याबरोबरच यंदा अनेक मंडळांनी आॅर्केस्ट्रा आयोजित केला आहे. यावेळी गरबा, दांडियासाठी ‘ढोली तारो ढोल बाजे’, ‘सोनू, तुला भरवसा नाय का?’, ‘नगाडा’, ‘झिंगाट’, ‘राधा कैसे न जले’, ‘सबसे बडा तेरा नाम ओ शेरोवाली’ आदी गाणी सर्वत्र ऐकायला मिळणार आहेत. याशिवाय फाल्गुनी पाठक व इतर गायकांच्या खास नवरात्र स्पेशल गाण्यांच्या अल्बम्सचाही जोर पहायला मिळेल. देवी मंदिर व नवरात्रोत्सव मंडळांच्या आवारात पहाटे देवींचे श्लोक, प्रार्थना, स्तुतिमंत्र, सकाळी धार्मिक भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, मराठी चित्रपटांमधील लोकप्रिय गाणी, तर सायंकाळच्या आरतीनंतरही बॉलिवूड, हॉलिवूड फेम गाणी, अल्बम्स ऐकायला मिळणार आहेत. शास्त्रीय पद्धतीने गरबा, दांडिया सादर करण्यावर अनेकांचा भर असून, यातून त्यांच्यातील नृत्यकलेत सफाई येत असून, शरीर सुडौल व्हायलाही मदत मिळत आहे. नवरात्रोत्सवा-निमित्त देवीच्या आराधनेसह वजन कमी करण्याचे, फिट होण्याचे ध्येयही अनेकांनी निश्चित केले आहे. या ध्येयाला ही उडत्या चालीची, धमाकेदार गाणी साथ देणार आहेत. दांडिया, गरबाच्या स्टेप्स उत्साहाने करण्यास या गाण्यांची मदत मिळणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी, राजस्थानी, पंजाबी भाषिक गाणी दांडियाप्रेमींना आकर्षित करीत आहेत.
नॉनस्टॉप दांडिया गाण्यांना पसंती
नवरात्र काळात दांडिया, गरबासाठी वैशिष्ट्यपूर्ण गाण्यांची आवश्यकता असते. ही मागणी लक्षात घेऊन म्युझिक कंपन्यांनी नॉनस्टॉप दांडिया ५० -१०० गाण्यांच्या सीडी, डिव्हीडी, स्पेशल अल्बम्स तयार केले आहेत. यातील ओरिजनल व पायरेटेड दोन्ही प्रकारांना मागणी आहे. दांडियाच्या गाण्यांबरोबरच देवीच्या आरती असणाºया डिव्हीडी, सीडींनाही मागणी आहे.

Web Title:  Dholle Taaro, Sonu, Zingat Songs Thrust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.