धोंडगव्हाणला वनौषधी झाडांची लागवड

By admin | Published: September 9, 2015 10:24 PM2015-09-09T22:24:22+5:302015-09-09T22:42:59+5:30

संगोपनासाठी लोखंडी जाळीचे कुंपण : पाण्यासाठी ठिबक सिंचन

Dhondagavani Herb planting plant | धोंडगव्हाणला वनौषधी झाडांची लागवड

धोंडगव्हाणला वनौषधी झाडांची लागवड

Next

वडनेरभैरव : दुर्मीळ अशा झाडांचे रोपण करण्याचे काम महिंद्रा शुभ-लाभ कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरू आहे, असे कंपनीचे क्वॉलिटी व्यवस्थापक स्वप्नील कदम यांनी सांगितले. धोंडगव्हाण (ता. चांदवड) येथे वृक्षलागवड कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच अनिता कडाळे होत्या.
यावेळी व्यासपीठावर कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, कादवाचे संचालक शिवाजीराव बस्ते, उपसरपंच शैला तिडके, तंटामुक्त समितीचे विभागीय अध्यक्ष रामकृष्ण तिडके, माजी सरपंच बबनराव पूरकर, राजाराम तिडके, विजय पूरकर, महिंद्रा शुभ-लाभचे सचिन पाटील, अभिषेक देशमुख, संदीप मुळे, संदीप इंगळे, राजेंद्र पूरकर, अंबादास पूरकर, मीनाक्षी पूरकर, मंगल पूरकर, संगीता वाघ, बाळू कडाळे आदि उपस्थित होते.
कंपनीकडून सामाजिक दृष्टिकोन म्हणून दरवर्षी दहा लाख नष्ट होत असलेल्या झाडांच्या जाती शोधून त्यांची लागवड करून झाडे वाढविण्यासाठी तीन वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. यानुसार याठिकाणी सुमारे तीनशे झाडांचे रोपण करण्यात आले आहे. यात रुद्राक्ष, सीता, अशोक, रक्तचंदन, सफेद चंदन, शिसव, पिवळा मोहर या सहा वनौषधींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. याचप्रमाणे यापुढील काळात जिल्ह्यात ठिकठिकाणी नेत्रतपासणी शिबिरे घेऊन मोफत चष्मे वाटप, शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाटर फिल्टर आदि उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास परशराम थेटे, सभापती रामदास कतवारे, शिवराम तिडके, डॉ. सुनील पाटील, विनायक तिडके, मधुकर जाधव, शंकर
जाधव, शिवाजी कतवारे, शरद पूरकर, अमोल सोनवणे, सुनील पूरकर, विठ्ठल पूरकर, भरत कडाळे, ग्रामविकास अधिकारी मुकेश वाघ, सुभाष पूरकर, किशोर परदेशी, विष्णुपंत अहेर, जयराम कतवारे, कैलास जाधव, किशोर परदेशी, लहानू पागे उपस्थित होते. सुभाष पूरकर यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)

Web Title: Dhondagavani Herb planting plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.