धुळे-नाशिक महामार्ग होणार सहापदरी

By Admin | Published: July 17, 2016 12:56 AM2016-07-17T00:56:23+5:302016-07-17T00:56:36+5:30

सुभाष भामरे यांची माहिती : वर्षभरात कामाला सुरुवात; प्रवास आणकी सुखकर होणार

The Dhule-Nashik highway will be six-lane | धुळे-नाशिक महामार्ग होणार सहापदरी

धुळे-नाशिक महामार्ग होणार सहापदरी

googlenewsNext

 मालेगाव : नाशिक - धुळे महामार्ग केंद्र सरकारच्या चतुष्कोन योजनेतून सहापदरी होणार असून, या महामार्गासाठीचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. वर्षभरात महामार्गाच्या कामाला सुरुवात होईल. त्यामुळे धुळे ते नाशिक हा प्रवास आणखी सुकर होणार आहे.
संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे धुळे ते नाशिक या महामार्गाचे सहापदरीकरण व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागील वर्षभरापासून प्रयत्न सुरू होते. त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरी-करणाला केंद्र सरकारने मान्यता प्रदान केली आहे.
केंद्र सरकारच्या योजनेतून या चतुष्कोन महामार्गासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे काम सुरू असून, वर्षभरात महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. त्यामुळे धुळे ते नाशिक हा प्रवास आणखी सुकर होणार आहे. सध्या धुळे येथून नाशिक येथे जाण्यासाठी अडीच तासाचा कालावधी लागतो. सदर महामार्ग सहापदरीकरण झाल्यावर हा कालावधी आणखी कमी होणार आहे.
या महामार्गाचे चौपदरीकरण काही वर्षांपूर्वी होऊनसुद्धा या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी झालेले नव्हते त्यामुळे या महामार्गाचे सहापदरीकरण व्हावे, अशी मागणी व प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच डॉ.सुभाष भामरे यांच्याकडे आला होता. सदर मागणीची केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दखल घेतली. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे याबाबत भेट घेतली होती. त्यावेळेला गडकरी यांनी डॉ. भामरे यांना आश्वासन दिले होते. धुळे ते नाशिक या चौपदरी महामार्गाचे लवकरच केंद्र सरकारच्या माध्यमातून सहापदरी-करण करण्यात येईल. या अनुषंगाने सदर प्रस्तावाला केंद्र शासनाच्या चतुष्कोन योजनेतून मंजुरी देण्यात आली. आता हा महामार्ग सहापदरी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नाशिक विभागीय कार्यालयाने डीटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. हा अहवाल नाशिक प्रकल्प कार्यालयाकडून दिला जाणार आहे. प्रधान कार्यालयाकडून अंतिम मंजुरीनंतर पुढील प्रक्रि या सुरु होणार आहे. तांत्रिक प्रक्रियेसाठी साधारणत: एक वर्षाचा कालावधी अपेक्षित असून, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरु वात होणार आहे. सदर महामार्ग सहापदरीकरणाचे काम तीन टप्यात पूर्ण होईल. (प्रतिनिधी)

Web Title: The Dhule-Nashik highway will be six-lane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.