धुळ्याच्या शुभांगी पाटील यांना नाशिकमधून ठाकरे गटाचे उपनेतेपद
By संजय पाठक | Published: October 16, 2023 06:11 PM2023-10-16T18:11:00+5:302023-10-16T18:12:40+5:30
आता नाशिकला एकूण चार उपनेते झाले आहेत.
संजय पाठक, भाजपने विधान परीषदेने उमेदवारी नाकारलेल्या आणि ऐनवेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाने पाठबळ दिलेल्या धुळ्याच्या शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने आता उपनेतेपद दिले आहे. शिवसेनेने नवीन नेते आणि उपनेत्यांची यादी आज घोषीत केली असून त्यात नाशिक मधून केाणाला संधी मिळाली नसली तरी धुळे जिल्ह्यातील शुभांंगी पाटील यांना नाशिकमधून उपनेतेपद देण्यात आले आहे. त्यामुळे आता नाशिकला एकूण चार उपनेते झाले आहेत.
आगामी लोकसभा आणि विधान सभा निवडणूकीच्या पाश्व'भूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने नाशिकवर लक्ष केंद्रीत केले असून त्यामुळे सध्या अनेक प्रकारचे फेरबदल केले जात आहेत. शिवसेनेने ठाकरे गटात अलिकडेच दाखल झालेले मालेगाव येथील अव्दय हिरे यांना उपनेतेपद दिले होते. पाठाेपाठ आता शुभांगी पाटील यांना संधी दिली आहे. यापूर्वी नाशिकमध्ये माजी मंत्री बबनराव घोलप आणि त्यांच्या नंतर शिवसेनेत पुर्नप्रवेशकर्ते दाखल झालेले सुनील बागुल यांना उपनेतेपद देण्यात आले होते.
शुभांगी पाटील या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी पदवीधर मतदार संघ निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. त्यावेळी भाजपाने त्यांना
उमेदवारी देण्याची तयारी केली आणि नंतर अचानक सत्यजीत तांबे यांना उमेदवारी दिली हेाती.