देवळालीत सर्व धर्मीयांचे धूलिवंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:11 AM2021-03-30T04:11:16+5:302021-03-30T04:11:16+5:30

धुळवड निमित्ताने लामरोड भागात मुंबईसह गुजरात भागातून आलेले नागरिक व येथे असलेल्या विविध आरोग्य धाममध्ये दाखल असलेल्या पर्यटकांनादेखील ...

Dhulivandan of all religions in the temple | देवळालीत सर्व धर्मीयांचे धूलिवंदन

देवळालीत सर्व धर्मीयांचे धूलिवंदन

Next

धुळवड निमित्ताने लामरोड भागात मुंबईसह गुजरात भागातून आलेले नागरिक व येथे असलेल्या विविध आरोग्य धाममध्ये दाखल असलेल्या पर्यटकांनादेखील रंगाच्या या उत्सवात समाविष्ट करून घेतले. नागरिकांनी कुठेही एकत्र न येता एकमेकांना रंगाने माखवताना पर्यावरणपूरक रंगाचा वापर करीत कोरडी धुळवड साजरी करत आनंद लुटला. जैन बांधवांच्या विविध आरोग्य धाममध्ये पर्यावरणपूरक रंगाची उधळण करत तरुणाई व बच्चे कंपनीने पाण्याचे फुगे उडवत एकमेकांना रंगाने भिजवले. जुन्या बसस्थानक येथे नागरिकांसह येथील लष्करी भागात परंपरेप्रमाणे होळी खेळण्यात आली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात साधेपणा जाणवत होता. कुठेही नियमाचा भंग होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली. दरवर्षी धुळवडीच्या दिवशी सर्व जाती, धर्माचे लोक एकत्र येऊन संपूर्ण शहरात रंगाची उधळण करतात. यंदा मात्र हा प्रकार कुठेही दिसला नाही. देवळाली कॅम्प पोलिसांनी शांतता समितीच्या बैठकीत याबाबत दिलेल्या सूचनांचे पालन नागरिक करताना दिसत होते.

(फोटो डेस्कॅनवर)

Web Title: Dhulivandan of all religions in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.