हरिनामाच्या गजराने दुमदुमली त्र्यंबकनगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 12:15 PM2020-01-20T12:15:40+5:302020-01-20T12:16:12+5:30
त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव समाधी स्थळाची महापुजा पहाटे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाल्यानंतर यात्रोत्सवाला प्रारंभ झाला.
त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव समाधी स्थळाची महापुजा पहाटे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाल्यानंतर यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. यात्रेसाठी राज्यातील शेकडो दिंड्या दाखल झाल्या असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने जय्यत तयार केली आहे. यात्रोत्सवासाठी ‘ज्ञानेश्वर माऊली तुकाराम’च्या गजर करीत लाखो वारकरी त्र्यंबक नगरीत पोहोचले आहेत. गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी पायी येणारे वारकऱ्यांची संख्या वाढली आहे. हरिनामाचा गजर सुरू असल्यामुळे त्र्यंबकेश्वरात भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. निवृत्तिनाथांची यात्रा म्हणजे वारकºयांसाठी पर्वणीच. त्र्यंबकेश्वर येथे मानकरी असलेले जुने फड आणि दिंड्या दाखल झाल्या आहेत. यावेळी नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर आणि उपनगराध्यक्ष दीपक गिते, मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी स्वागत केले. भाविकांनी गोदावरीच्या उगमस्थानी ब्रह्मिगरी पर्वतावर जाण्यासाठी गर्दी केली होती. श्री संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेसाठी आलेल्या श्री कृष्णाजी माऊली दिंडीतील हजारो वारकºयांनी रिंगण करून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पायी आपली सेवा रु जू केली आहे.