इगतपुरी तालुक्यासह घोटीत धुवाधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:11 AM2021-06-24T04:11:38+5:302021-06-24T04:11:38+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून ऊन-पावसाचा खेळ चालू असल्याने शेतकऱ्यांची ओढ पावसाकडे लागून राहिली होती. आज दुपारी ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून ऊन-पावसाचा खेळ चालू असल्याने शेतकऱ्यांची ओढ पावसाकडे लागून राहिली होती. आज दुपारी घोटी व परिसरात तसेच इगतपुरी परिसरातही धुवाधार पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे. जून महिन्याचा पहिला पंधरवडा चांगलाच कोरडा गेल्याने तालुक्यात सर्वांच्याच नजरा दमदार पावसाकडे लागून राहिल्या होत्या. गेल्या काही दिवसापासून तुरळक पाऊसवगळता दमदार पाऊस नसल्याने चिंतेचे ढग दिसत होते. दुपारपासून अनपेक्षितपणे तालुक्यात बहुधा सर्वच भागात दमदार पाऊस सुरू झाल्याने शेतकरीवर्ग तसेच व्यावसायिक वर्ग काहीसा सुखावला गेला. इगतपुरी तालुक्यातील भाताच्या लागवडीसाठी आजचा पाऊस पोषक असून, हीच संततधार राहिल्यास याच आठवड्यात आवण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. आजच्या पावसामुळे तालुक्याच्या सखल भागात सर्वत्र पाणी दिसत होते. नाले, गटारीही खळखळून वाहत असल्याचे चित्र दिसत होते. (२३ घोटी ३)
===Photopath===
230621\23nsk_22_23062021_13.jpg
===Caption===
२३ घोटी ३