वणी ग्रामीण रुग्णालयात सर्व रोग निदान, शस्त्रक्रिया शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:32 PM2021-01-18T16:32:50+5:302021-01-18T16:33:27+5:30
वणी : वणी ग्रामीण रुग्गालयात बुधवार (दि.२०) ते शनिवार (दि.२३) जानेवारी या कालावधीत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहीती वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेन्द्र बागुल यांनी दिली.
वणी : वणी ग्रामीण रुग्गालयात बुधवार (दि.२०) ते शनिवार (दि.२३) जानेवारी या कालावधीत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहीती वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेन्द्र बागुल यांनी दिली.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा रुग्णालय नाशिक वणी व दिंडोरी ग्रामीण रुग्णालय यांचे संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पहील्या दिवशी तपासणी दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया व अंतिम दिनी शस्त्रक्रीया झालेल्यांची तपासणी अशी क्रमवारी आहे. ॲपेंडिक्स, हर्निया, मुळव्याध, फिशर, भगंदर, गर्भपिशवी, दातांच्या शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या व इतर शस्त्रक्रिया नामांकीत शल्यचिकीत्सकांकडुन करण्यात येणार आहे.
बालरोग, स्त्री रोग, प्रसुती, दंतचिकीत्सक, बाधीकरण अस्थिरोग, दंतचिकीत्सक, कान, नाक, घसा अशा बाधितांवर उपचार करण्यात येणार आहे. वरखेडा, निगडोळ, पांडाणे, खेडगाव, वारे या प्राथमिक केन्द्राबरोबर वणी व दिंडोरी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग असणार आहे.डॉ. सुजित कोशीरे, डॉ. प्रशांत खैरे, डॉ. कपील आहेर,डॉ. रत्ना रावखंडे, डॉ. पी. डी. गांडाळ या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत शिबीरास उपस्थिती राहण्याचे आवाहन डॉ. राजेन्द्र बागुल यांनी केले आहे.
(१८ वणी)