कर्करोगाचे ‘जपायगो’तर्फे निदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:36 AM2018-12-14T01:36:39+5:302018-12-14T01:37:00+5:30

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात कॅन्सरचे निदान व उपचार पद्धती देण्यासाठी ‘जपायगो’ संस्थेतर्फे सुविधा देण्यात येणार आहे. बुधवारी सहसंचालक डॉ. साधना तायडे यांच्या हस्ते ‘कॅन्सर केअर’चे उद्घाटन करण्यात आले.

Diagnosis by Cancer 'Zapayogo' | कर्करोगाचे ‘जपायगो’तर्फे निदान

कर्करोगाचे ‘जपायगो’तर्फे निदान

Next
ठळक मुद्देकर्करोगाचे ‘जपायगो’तर्फे निदानसंदर्भ रुग्णालय : साधना तायडे यांच्या हस्ते ‘कॅन्सर केअर’चे उद्घाटन

नाशिक : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात कॅन्सरचे निदान व उपचार पद्धती देण्यासाठी ‘जपायगो’ संस्थेतर्फे सुविधा देण्यात येणार आहे. बुधवारी सहसंचालक डॉ. साधना तायडे यांच्या हस्ते ‘कॅन्सर केअर’चे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. तायडे म्हणाल्या की, असंसर्गजन्य रोग जसे उच्च रक्तदाब, मधुमेह व कॅन्सरपूर्वी वयाच्या ४० नंतर आढळत होते. मात्र आजकाल तिशीच्या घरात पोहोचले आहेत. यासाठी एन.सी.डी. उपक्रमांतर्गत सर्वांचे स्क्रिनिंग होणे व त्वरित उपचार देणे महत्त्वाचे ठरते. हा उपक्रम गर्व्हमेंट इन्स्टिट्यूट व प्रायव्हेट इन्स्टिट्यूट व एन.जी.ओ. यांनी राबविला, तर रुग्णांना लाभदायक ठरू शकतो. तर उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी, कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्याला पुढील सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी ही मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डेकाटे, डॉ. अनंत पवार, मानवता क्युरी सेंटरचे डॉ. राज नगरकर, डॉ. संकलेचा, डॉ. नामपल्ली, डॉ. पराग भांबरे, डॉ. आशीष श्रीवास्तव, चिनार पाटील हे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. नीलेश पाटील यांनी केले, तर प्रस्तावना डॉ. शिल्पा बांगर यांनी केले. आभार डॉ. राहुल विधाते यांनी मानले.
जिल्ह्यात झालेल्या कॅन्सरच्या स्क्रिनिंगमध्ये १७ टक्के कॅन्सर हे मौखिक कर्करोगाचे, २० टक्के स्तनाचे, १६ टक्के गर्भाशय मुखाचे व ३९ टक्के हे इतर कॅन्सरचे आहेत. त्यामुळे कॅन्सर उपचार देण्यासाठी परिपूर्ण व सज्ज यंत्रणा तयार होणे अपेक्षित असल्याचे डॉ. तायडे यांनी सांगितले,

Web Title: Diagnosis by Cancer 'Zapayogo'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.