कृषी आयुक्तांकडून शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:02 PM2021-06-30T16:02:03+5:302021-06-30T16:04:05+5:30
सिन्नर : तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी आधुुनिक तंत्रज्ञानावर संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासह मार्गदर्शन केले.
सिन्नर : तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी आधुुनिक तंत्रज्ञानावर संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासह मार्गदर्शन केले.
रिसोर्स बँकेतील शेतकरी, चंदन व सोलापूर लाल डाळिंब शेतीचा प्रयोग राबविणारे तालुक्यातील उजनी येथील राम मोहन सुरसे यांच्याकडून पीकांविषयी माहिती घेतली, तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांशी शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत संवाद साधला. चंदन शेतीस विमा संरक्षण, संरक्षणात्मक बाबींसाठी शासकीय अर्थसाहाय्य मिळावे, यासह इतर मागण्यांचे निवेदन सुरसे यांनी आयुक्तांना दिले.
कृषी आयुक्त कुमार यांनी सिन्नर तालुक्याचा दौरा केला. नायगाव येथील गोदा दारणा अग्रो प्रोड्युसर कंपनीच्या एकात्मिक कृषी विकास (आयएडी) कांदा प्रकल्पास भेट देत कांदा खरेदीबाबत माहिती घेतली. यावेळेस अध्यक्ष एकनाथ सानप, संचालक रवींद्र कापडी, अर्जुन दिघोळे, गणेश पानसरे, संदीप लहाने, मंडळ कृषी अधिकारी महेश वेठेकर, कृषी पर्यवेक्षक रणजित आंधळे, कृषी सहायक सचिन भगत आदी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे राज्यस्तरीय पीक स्पर्धा विजेते सुहास वसंतराव बर्वे, अप्पासाहेब नामदेव आरोटे यांची भेट देऊन शेतीत वापरलेल्या तंत्रज्ञानाबाबत चर्चा केली. याप्रसंगी नानासाहेब संधान, योगेश संधान, सुनील गाडे, मनोज गाडे, लक्ष्मण बर्गे, हरिराम गाडे, निखिल बर्वे, अशोक वाजे, विभागीय कृषी सह संचालक संजीव पडवळ, विभागीय कृषी अधीक्षक अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, सहायक अर्चना चौधरी, वंदना कुऱ्हाडे, प्रदीप भोर, दीपक कुसळकर उपस्थित होते.
पीक स्पर्धेत सिन्नरची आघाडी
रबी हंगाम २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या पीक स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील ५३ शेतकऱ्यांनी गहू पिकात सर्वसाधारण गटात, तर आदिवासी गटात ५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. हरभरा पिकात १५ सर्वसाधारण शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. या राज्यस्तरीय स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. यात डुबेरे येथील सुहास वसंतराव बर्वे यांनी ९०.७१० क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादकतेसह राज्यात प्रथम, तर महाजनपूर येथील अप्पासाहेब नामदेव आरोटे यांना ९० क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादकतेसह द्वितीय क्रमांक मिळाला आहे.